Close

बहुगुणी आलं (Bahuguni Ginger)

भारत हा मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो. मसाल्यांच्या पिकांमध्ये मिरी, दालचिनी, वेलची, लवंग, आलं, हळद इत्यादी पिकांना मानाचं स्थान आहे. आलं हेदेखील एक महत्त्वाचं पीक आहे. भारतामध्ये आल्याचा वापर कमी-जास्त प्रमाणात सर्वत्र केला जातो. त्यामुळे आल्याची लागवड ही जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत केली जाते.
आलं जेवणात वापरलं जातंच; पण आल्याचे औषधी गुणधर्म हे अगदी आयुर्वेदापासून सांगितले जातात. आल्याचं आयुर्वेदातील स्थान महत्त्वाचं आहे. आल्याचा वापर मुख्यत: सर्दी, खोकल्यावरील औषधं; तसंच पेय बनवण्यासाठी, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे आल्याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे.
आल्याचा वास व तिखटपणा आल्हाददायक असतो. आलं पाचक असल्याने अनेक पदार्थात आल्याचा उपयोग करतात.
> आल्याचा किंवा सुंठीचा काढा पाच मिनिटं पाण्यात उकळून करतात. या उष्ण पेयामुळे रक्ताभिसरण सुधारतं. सर्दी, पडसे नाहीसं होतं. डोकेदुखी थांबते. आल्यात जंतुनाशक व उत्तेजक गुणधर्म आहेत.
आल्याच्या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्यातदेखील केला जातो. अतिसार झाल्यास आल्याच्या रसाचा बेंबीवर लेप करावा.
> आल्याचा रस व मध समप्रमाणात बाटलीमध्ये साठवून 2-2 चमचे दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे व स्वरभंग बरे होतात.
> अजीर्ण झाल्यास आल्याच्या रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावं. आलं तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात. लाळ पाझरू लागते.
> आल्याच्या सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही. पोटदुखी व मळमळ या विकारात उपयोगी आहे.
आल्यामुळे चहा सुगंधी व स्वादिष्ट बनतो. आल्यामुळे चहातील निकोटीनचं प्रमाण
कमी होतं.

Share this article