अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या चाहत्यांसाठी एक अस्वस्थ करणारी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीची प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने स्वतः इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे.
सध्या देशभरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आत्तापर्यंत अनेक जण त्याला बळी देखील पडले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरही या आजाराची शिकार झाली आहे.
भूमीने बुधवारी सकाळी इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, एका डेंग्यूच्या डासाने 8 दिवस माझा छळ केला, पण आज जेव्हा मला जाग आली तेव्हा मला छान वाटले आणि या आनंदात मला सेल्फी घ्यावासा वाटला.
या पोस्टमध्ये भूमीने तिच्या चाहत्यांना डेंग्यूबाबत काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. तिने लिहिले आहे की, मित्रांनो, सावध राहा, कारण गेले काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण गेले आहेत. यावेळी, मच्छर प्रतिबंधक खूप महत्वाचे आहेत आणि आपल्या प्रतिकारशक्तीची देखील पूर्ण काळजी घ्या. माझ्या ओळखीतल्या अनेकांना अलीकडेच डेंग्यू झाला आहे. एका अदृश्य व्हायरसने परिस्थिती बिघडवली आहे. माझी इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल माझ्या डॉक्टरांचे आभार, @hindjahospital @bajankhusrav #DrAgarwal, नर्सिंग, स्वयंपाकी आणि सफाई कर्मचार्यांचे खूप खूप आभार.
भूमी पेडणेकरच्या कामाबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री नुकतीच थँक यू फॉर कमिंग या चित्रपटात दिसली. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. याशिवाय तिचा 'द लेडी किलर' हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. अभिनेत्री आगामी काळात अनेक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.