Close

एखाद्याच्या मृत्यूला स्वत:ची व्हॉटिंग बॅंक बनवणं थांबव! अंकिता लोखंडेवर भडकले नेटकरी (Bigg Boss 17: Ankita Lokhande Gets Trolled For Talking About Sushant Singh Rajput And Using His Name Continue In The Show)

अंकिता लोखंडेने बिग बॉसमध्ये सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु यावेळी ती जे काही बोलली त्यावर लोक चांगलेच संतापले आणि अंकिताला वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली.

मुनव्वरने अंकिताला वेस्ट बीन म्हटले होते आणि असेही म्हटले होते की ती नेहमी चूक किंवा भांडण झाल्यावर मस्का लावायला लागते, म्हणून ती खोटी आहे. अंकिताने मुनव्वरला सांगितले की, जेव्हा माझे कोणाशी नाते निर्माण होते तेव्हा तो माझ्यासोबत काही खुलासा करायला येतो तेव्हा मी त्याला हाकलून देत नाही. मी त्याचे ऐकते.

अंकिता म्हणाली की, मी खऱ्या आयुष्यातही अशीच आहे, मी माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवत नाही. मी नेहमीच माझे नाते जपण्याचा प्रयत्न करते. अंकिता पुढे म्हणाली की, ज्या व्यक्तीला मी वर्षानुवर्षे डेट केले ती व्यक्ती मला सोडून गेली तेव्हाही लोक माझ्यावर आरोप करत होते. एवढ्या मोठ्या ब्रेकअपनंतरही लोकांनी माझ्याकडे बोटे दाखवली पण तरीही मी काही बोलले नाही. मी दोन वर्षे त्याची वाट पाहिली पण तो परत आला नाही तेव्हाही मी त्याच्याबद्दल काही चुकीचे बोलले नाही.

अंकिताने सुशांतचे नाव घेतले नसले तरी ते त्याच्याचबद्दल बोलले जात असल्याचा लोकांनी अंदाज लावला. त्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर अंकिताला सल्ला देत आहेत की कोणाच्याही मृत्यूला तुमची वोट बँक बनवू नको. सुशांतच्या नावावर सहानुभूती घेणे थांबव आणि त्याचा वारंवार असा उल्लेख करू नको. अंकिता तिच्या खेळासाठी सुशांतचे नाव जाणूनबुजून वापरते, असे लोकांना वाटते.

तिला फक्त सुशांतच्या नावावर बिग बॉस जिंकायचे आहे, असे चाहते म्हणत आहेत. कधी बघितले तर ती त्याच्या नावाने मते मागते. लग्नानंतर आपल्या एक्सबद्दल तिच्यासारखे कोणी बोलत नाही.

याआधीही ती अनेकदा अभिषेकसोबत सुशांतबद्दल बोलताना दिसली आहे, जे लोकांना आवडले नाही.

Share this article