मुनव्वर फारुकीने रिॲलिटी शो 'बिग बॉस १७' च्या ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. त्यानंतर त्याचे तो राहत असलेल्या ठिकाणी म्हणजेच डोंगरी येथे जंगी स्वागत झाले. त्याच्या आजुबाजूला चाहत्यांचा गराडा पाहायला मिळाला. पण घरी आल्यावर मात्र त्याने ३ महिने आपल्यापासून दूर असलेल्या लेकासोबत सेलिब्रेशन केले. ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुनव्वरने आपल्या मुलासोबत हे यश साजरे केले. दोघांनी मिळून घरी केक कापला. खरेतर महाअंतिम सोहळ्याच्या दिवशीच मुनव्वरचा वाढदिवसही होता. त्यामुळे शोमध्ये मिळालेले यश आणि वाढदिवस असे दुहेरी सेलिब्रेशन करण्यात आले. सेलिब्रेशनचा क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये मुनव्वर आपल्या घरी पोहचला आहे. 'बिग बॉस १७' ची ट्रॉफी टेबलवर ठेवली आहे, तो आपल्या मुलासोबत दोन केक कापत आहे. केक कापल्यानंतर तो प्रथम आपल्या मुलाला भरवतो. दोघेही बापलेक खुप खुश दिसत आहेत.
'बिग बॉस १७' ची ट्रॉफी घेऊन मुनव्वर डोंगरी येथे पोहोचला तेव्हा त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या चाहत्यांचे प्रेम पाहून मुनव्वर देखील खुप भारावून गेला होता.
मुनव्वर कंगना रणौतच्या रिॲलिटी शो 'लॉकअप'मध्ये होता त्याने आपले लग्न झाल्याचे आणि एक मुलगा असल्याचे सांगितले होते. अगदी लहान वयातच लग्न झाल्याचंही मुनव्वरने सांगितलं. आता त्याचा घटस्फोट झाला आहे. आणि मुलाची कस्टडी त्याच्याकडे आली आहे.