Close

ग्रँड सेलिब्रेशनमध्ये बिग बॉसने वाढवलं अंकिता अन् डीपी दादाचं मनोधैर्य (Bigg Boss Marathi 5 Update Ankita Walavalkar And Dhananjay Powar Av Episode )

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आता ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. सध्या घरात एकूण 7 सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर… ही आहे महाराष्ट्र हार्टेड गर्ल..". तर डीपीबद्दल बोलताना बिग बॉस म्हणत आहेत,"या डीपीचं मनोरंजन भन्नाट होतं..या डीपीचा खेळ रंपाट होता…हा डीपीच झिंग झिंग झिंगाट होता".

'बिग बॉस' स्वत: सध्या घरातील प्रत्येक सदस्याचं मनोधैर्य वाढवताना दिसत आहेत. आजचा हा विशेष भाग पाहायला विसरू नका.

Share this article