बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूप विशेष असणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा सध्या शेवटचा आठवडा सुरू असून आज घरात 'आपला माणूस' शिव ठाकरे स्पेशल गेस्ट म्हणून जाणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमधील अभिजीत सावंतचा अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता, सगळ्यांत मिळून मिसळून वागणारा, कधी गाणी गाऊन मंत्रमुग्ध करणारा अभिजीत सावंत". 'बिग बॉस मराठी'च्या या पर्वातील ग्रँड सेलिब्रेशनमध्ये होणारं कौतुक ऐकून अभिजीतचेही डोळे पाणावले. प्रोमोमध्ये अभिजीत म्हणतोय,"या शोने खूप काही दिलंय".
'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूपच वेगळा असेल. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार आहे जे प्रेक्षकांना आजच्या विशेष भागात पाहायला मिळेल.