ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजपासून बिग बॉसचा दुसरा सीजन सुरू होणार आहे. आता ओटीटीवर देखील अभिनेता सलमान खान बिग बॉसचं होस्टिंग करणार आहे. या शोमध्ये अनेक नावाजलेले टीव्ही स्टार भाग घेणार आहे..
बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीजन सुरू होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. या सीजनची पूर्वीपेक्षाही अधिक क्रेझ वाढली आहे. त्याचं कारण म्हणजे हा शो अभिनेता सलमान खान होस्ट करणार आहे. छोट्या पड्याद्यावर बिग बॉसला हिट केल्यानंतर आता सलमान खान ओटीटीवरील बिग बॉसलाही हिट करण्याच्या तयारीत आहे. सलमानने या शोची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
बिग बॉस आणि सलमान खान हे एक समीकरण झालं आहे. सलमानला होस्ट करताना पाहणं ही त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. त्यामुळेच आता निर्मात्यांनी सलमान खानला ओटीटीवर आणलं आहे. सलमान खानच्या या ओटीटीवरील बिग बॉसला पाहण्यासाठी त्याचे चाहतेही प्रचंड उत्सुक झाले आहेत.
ओटीटीवरील बिग बॉसच्या स्पर्धकांच्या नावाचा खुलासा झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज १७ जूनपासून ‘बिग बॉस ओटीटी 2’ सुरू होत आहे. हा शो तुम्ही जियो सिनेमावर पाहू शकता.