Close

एल्विश यादवची सार्वजनिक ठिकाणी हाणामारी, आईबहिणींवरुन कमेंट केल्याने राग अनावर ( Bigg Boss Ott 2 Fame Elvish Yadav Fighting Video Viral)

एल्विश यादव हा एक भारतीय YouTuber, स्ट्रीमर आणि गायक आहे त्याच्या जबरदस्त यूट्यूब कंटेन्टमुळे, त्याला मोठी ओळख मिळाली आणि बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन जिंकून यश मिळवले. रविवारी संध्याकाळी २६ वर्षीय एल्विश यादवने जयपूरमधील रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीला मारल्याने तो अडचणीत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने एल्विश यादवच्या कुटुंबावर टिप्पणी केली, त्यानंतर त्याने संतप्त प्रतिक्रिया दिली.

जयपूरमधील एका हाय-प्रोफाइल रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. एका व्हायरल व्हिडिओनुसार, 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' चा विजेता एल्विश यादव एका माणसाला मारताना दिसत आहे. त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. एल्विश यादव यांच्या पीआर टीमने या घडामोडीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण एल्विशच्या वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

या क्लिपमध्ये तो म्हणतोय, 'बघा भाऊ, ना मला भांडणाचा शौक आहे, ना मला मारामारीचा शौक आहे. मी माझ्या कामाशी काम ठेवतो. जो कोणी फोटो काढायला सांगेल त्याच्यासोबत फोटो मी काढतो. तुम्ही पाहू शकता की पोलिस आणि कमांडो देखील आहेत. पण माझ्या आई किंवा बहिणीला कोणी शिवीगाळ केली तर मी सोडणार नाही. तो शिवीगाळ करू लागला तेव्हा मी त्याला मारले. माझी स्वतःची पद्धत आहे. तो तोंडाने बोलतो, मी तोंडाने बोलू शकत नाही.

दरम्यान, एल्विशचे फॅन पेज असेलल्या ट्विटरवर या घटनेवर संदेश लिहिला होता. फॅन पेजने ट्विट केले की, अनादराचे परिणाम होतात आणि @ElvishYadav हे हलकेपणाने सहन करू शकत नाहीत. एक कानाखाली कठोर वाटू शकते, परंतु ती एखाद्याच्या कुटुंबाच्या अपमानची प्रतिक्रिया  आहे. आदर हा दुतर्फा रस्ता आहे आणि कधीकधी इतरांना त्याची आठवण करून देण्यासाठी तो तीव्र प्रतिक्रिया घेते. म्हणून, निर्णय घेण्यापूर्वी, त्याचा विचार करा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीचे परिणाम आहेत.

Share this article