Close

एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या, युट्यूबरकडून मोठी कबुली ( Bigg Boss Ott 2 Winner Elvish Yadav Rave Party Case Trouble Increase)

एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी १७ मार्च रोजी साप आणि त्याच्या विषाच्या तस्करी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. एल्विशने चौकशी दरम्यान पार्टीत साप आणून विष पुरवठा केल्याची कबुली दिली आहे.

एल्विश यादवला इतर कैद्यांप्रमाणे सामान्य सेलमध्ये ठेवण्यात येणार होते, मात्र तो सेलिब्रिटी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव जेल प्रशासनाने त्याला कडक सुरक्षा असलेल्या सेलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.

चौकशीदरम्यान एल्विश यादवने फाजिलपुरियाच्या पार्टीचा उल्लेख केला होता. फाजिलपुराच्या पार्टीत आपण सापांचा व्हिडीओ बनवल्याचे त्याने कबुल केले. यापूर्वी, नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या चौकशीदरम्यान, एल्विशने पोलिसांसमोर कबूल केले होते की फाजिलपुरियानेच पार्टीमध्ये सापांना आणले होते.

एल्विश यादवने या प्रकरणातील सर्व आरोपी आणि सर्पमित्र राहुलला ओळखत असल्याची कबुली दिली. या सर्वांना तो वेगवेगळ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये भेटला. एल्विश यादवचा अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीत सहभाग आढळून आला असून त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत अनेक गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.

. याशिवाय यूट्यूबर सागर ठाकूरला मारहाण केल्याप्रकरणीही गुरूग्राम पोलीस एल्विश यादवची चौकशी करू शकतात. अलीकडेच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते, ज्यामध्ये एल्विश यादव सागरला मारहाण करताना दिसला होता

Share this article