Close

जन्मजातच बिपाशा आणि करणच्या छोट्याशा देवीच्या हृदयाला दोन छिद्र होती, तीन महिन्यांत झाली शस्त्रक्रिया (Bipasha Basu Breaks Down As She Reveals Her Daughter Devi Was Born With 2 Holes In Heart, Had To Undergo Open Heart Surgery)

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि पती करणसिंग ग्रोव्हर हे त्यांची लाडकी लेक देवीमुळे चर्चेत राहतात. दोघंही आपल्या लाडक्या लेकीवर जीव ओवाळून टाकतात. नेहमी लेकीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर करत असतात. मात्र सोशल मिडियावर त्यांची मुलगी जशी हसतांना आणि हेल्दी दिसते. तशी ती खऱ्या आयुष्यात नव्हती.

बिपाशा आणि करणच्या नवजात मुलीला वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्टचा त्रास होता. छोट्याशा देवीच्या हृदयाला दोन छिद्र होती. त्यानंतर तिच्यावर ती ३ महिन्यांची असतांना शस्त्रक्रिया करण्यात आली. याबद्दल बिपाशा यापुर्वी काही बोलली नव्हती. मात्र अलीकडेच नेहा धुपियासोबत इंस्टाग्राम लाईव्हवर बोलताना बिपाशानं ही माहिती दिली. यावेळी बिपाशा खुप भावूक झाली.

नेहा धुपियासोबत इंस्टाग्राम लाईव्हवर बोलतांना बिपाशा म्हणाली की, त्यांचा प्रवास हा सामान्य पालकांपेक्षा वेगळा होता. तिच्यासोबत घडलेला प्रसंग कोणत्याही आईवर येवु नये. तिला लेकीच्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी कळले की मुलीच्या हृदयाला दोन छिद्र आहेत. त्यावेळी त्यांना व्हीएसडी म्हणजे काय असतं हे देखील कळालं नव्हतं. बिपाशा आणि करणने याबद्दल घरच्यांना सांगितले नव्हते. कारण त्यावेळी ती स्वत:ही खुप घाबरली होती.पुढे बिपाशाने सांगितले की, सुरुवातीचे पाच महिने त्यांच्यासाठी खुप अवघड होते. देवी ही पहिल्या दिवसापासूनच खुप हूशार होती. दर महिन्याला ती स्वत:च बरी होतेय की नाही हे पाहण्यासाठी तिला स्कॅन करावे लागेल आणि हृदयाची छिद्र मोठी असल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र इवल्याशा जीवाची ओपन हार्ट सर्जरी कशी करायची या विचारानेच ते दोघेही घाबरले होते. त्यांना सुरुवातीला वाटले की ती स्वत:च बरी होईल मात्र दोन महिन्यात तसं काही झालं नाही. तिसऱ्या महिन्यात त्यांना लेकीची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यासाठी बिपाशा तयार होती मात्र करण तयार नव्हता.

शेवटी बिपाशानं सांगितलं की , त्यावेळी देवी तीन महिन्यांची होती आणि तिचं ऑपरेशन सहा तास चाललं होतं. जेव्हा देवी ऑपरेशन थिएटरमध्ये होती तो काळ त्यांच्यासाठी खुप कठिण होता. त्याचं आयुष्य थांबलं होत. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर ती बरी आहे. आता देवी आठ महिन्याची आहे आणि स्वस्थ आहे.

Share this article