अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला कुठेतरी गेली तरी तिची चर्चा होतेच. ती सहज लाईमलाइटमध्ये येते. ती सध्या फ्रान्समध्ये आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशा कार्यक्रमांना गेल्यावर लोकांचे लक्ष आपल्याकडे कसे वेधले जाईल, आपला लूक कसा दिसेल याकडे ती पूरेपूर लक्ष देते. त्यामुळेच गेल्यावर्षीप्रमाणे यावेळीही तिने थोडंस हटके दिसण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे ती चर्चेत आली.
उर्वशी रौतेला ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर दिसली होती. यावेळी तिने निळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. या गाऊनमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. लोक तिचे कौतुकही करत होते. पण काहींच्या नजरा तिच्या गळ्याकडे खिळल्या होत्या. तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या गळ्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. बऱ्याचजणांना गेल्यावर्षीच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची आठवण झाली.
उर्वशी रौतेलाने गेल्या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर मगरीचा नेकलेस घालून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता यावेळीही तिने असेच काहीसे केले आहे.
तिच्या गळ्यात एक नेकलेस हार होता, जो एखाद्या प्राण्यासारखा दिसत होता. एका बाजूने साप आणि दुसऱ्या बाजूने कोणत्या तरी प्राण्याच्या शेपटीचा आकार होता. ते पाहून अनेकांना हा नक्की कसला प्रकार आहे हा प्रश्न पडला आहे. कमेंट सेक्शनमध्ये बरेचजण याबाबत तर्क लावत आहेत.