Close

भाजपचे ज्येष्ठ लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा (Bjp Leader Lal Krishna Advani Will Be Conferred With Bharat Ratna Award PM Modi Announcment)

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून ही माहिती दिली.

https://twitter.com/narendramodi/status/1753660421809066495?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1753660421809066495%7Ctwgr%5E346f398c88c62bef9800aac6d32eef2cf448b43c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Flk-advani-announced-bharat-ratna-prime-minister-narendra-modi-announced-sgk-96-4191391%2F

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर लिहिलंय की, “मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या सन्मानाने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. ग्राऊंड लेव्हलवरून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात करून उपपंतप्रधानपदी विराजमान होऊन देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचा प्रवास होता. गृहमंत्री आणि सूचना आणि प्रसारण मंत्री रुपानेही त्यांनी त्यांची प्रतिमा तयार केली. त्यांचा संसदेतील सहभाग नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहे.”

(Photo - Social Media)

Share this article