अभिनेत्री आणि मंडीच्या खासदार कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कंगना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या कंगना यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या घरात लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. कंगना यांनी साखरपुड्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सांगायचं झालं तर, कंगना रनौत नुकताच कुटुंबातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे फोटो देखील कंगना यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कंगना रनौत यांचा लहान भाऊ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कंगना यांनी भावाच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत खास कॅप्शन देखील दिलं आहे. सोशल मीडियावर देखील कंगना यांनी पोस्ट केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
कंगना यांनी भावाच्या साखारपुड्याचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘भाई तुझं तर काम झालं आता… सर्वात लहान आहे, पण लग्न सर्वात आधी…’ असं लिहिलं आहे. कंगना यांनी कुटुंबियांसोबतचे काही फोटो देखाल पोस्ट केले आहेत. कंगना यांनी भावाच्या साखरपुड्यासाठी एक साधा पण सुंदर लूक केला होता. अभिनेत्रीने गोल्डन बॉर्डर असलेला पांढरा रंगाचा लेहेंगा घातला होता.
सांगायचं झालं तर, कंगना रनौत अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत, ज्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. शिवाय अनेक वादग्रस्त कारणांमुळे देखील कंगना चर्चेत असतात. एवढंच नाही तर, अनेक मुद्द्यांवर देखील कंगना स्वतःचं परखड मत मांडतात.
अलिकडेच कंगना यांनी भाजपच्या वतीने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवून खासदार पदाची धुरा स्वीकारली आहे. यापूर्वी बॉलिवूडमध्येही आपल्या कसदार अभिनयाची प्रचिती देत त्यांनी स्वतःची भक्कम ओळख निर्माण केलेली आहे.