Close

ब्लॅकआउट चित्रपटाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित (Blackout Teaser Out)

विक्रांत मॅसीच्या १२ फेल या चित्रपटाने घवघवीत यश मिळविले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता विक्रांत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. विक्रांतचा आगामी चित्रपट ब्लॅकआउटचा टीझर प्रदर्शित झाला आहे. क्राईम आणि थ्रिलरसह चित्रपटात भरपूर कॉमेडी देखील केली गेली आहे. या टीझरला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळत आहे.

ब्लॅक आउट या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला अनिल कपूर यांचा वक्त बदलनेवाला है असा संवाद ऐकू येतो. या टीझरमध्ये विक्रांत मेस्सी हा एक गाडी चालवताना दिसत आहे. त्या गाडीची दुसऱ्या गाडीला धडक लागते, त्यानंतर विक्रांतच्या गाडीमधील सर्व सामान बाहेर पडते. त्या सामानात पैसे, सोन्याचे दागिने असतात. हे पाहून विक्रांत आश्चर्यचकित होतो. त्यानंतर टीझरमध्ये पुढे मौनी रॉय आणि सुनील ग्रोवर यांची देखील झलक बघायला मिळते.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सौरभ घाडगे आणि करण सोनावणे हे देखील ब्लॅकआऊटच्या टीझरमध्ये दिसत आहेत. देवांग भावसार या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. याचा प्रीमियर ७ जून २०२४ पासून JioCinema वर येईल. विक्रांतचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Share this article