Close

‘अ‍ॅनिमल’च्या यशाने बॉबी देओलला आले गहिवरुन, अश्रूंना आवर घालत मानले जनतेचे आभार ( Bobby Deol Feel Overwhelmed by success of Animal Movie, said thanks to papprazzi)

बॉबी देओलने कधीही कल्पना केली नसेल की भाऊ सनी देओलप्रमाणे त्याच्या आयुष्यातही एक दिवस येईल जेव्हा स्टारडम पुन्हा एकदा त्याच्या पायांशी लोळन घालेल. पण 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने अखेर असा दिवस आणला. 1 डिसेंबरला रिलीज झालेला 'अ‍ॅनिमल' सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. एकीकडे या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत बंपर कमाई करून अनेक विक्रम मोडले आहेत, तर दुसरीकडे बॉबी देओलचेही कौतुक होत आहे. इतके प्रेम मिळाल्यावर आणि चित्रपटाचे ब्लॉकबस्टर यश पाहून बॉबी देओलच्या अश्रूंचा बांध फुटला.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बॉबी देओल पापाराझींनी घेरलेला पाहायला मिळतो. तो गाडीत बसून रडत आहे. बॉबी देओलने त्याच्या करिअरमध्ये बरेच चढ-उतार पाहिले. त्याच्यावर नुसती घरात बसण्याची वेळ आलेली. त्याला कामही मिळत नव्हते. पण पहिल्या 'रेस 3' आणि 'आश्रम' या सीरिजने त्याचे दिवस पालटले. आता अ‍ॅनिमलने त्याला पुन्हा स्टार बनवले. नुकताच बॉबी देओल पापाराझींना भेटला तेव्हा चाहत्यांचे आभार मानताना त्याला रडू आले.

https://x.com/crazy4bolly/status/1731121006125973563?s=20

बॉबी देओल आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि रडू लागला. त्याच्यासोबत आलेल्या लोकांनी त्याला कसेतरी गप्प केले. बॉबी देओल पुन्हा पापाराझीला भेटला आणि त्यांचे आभार मानले आणि म्हणाला, 'खूप खूप धन्यवाद. देव खूप दयाळू आहे. या चित्रपटाला खूप प्रेम मिळत आहे. असे वाटते की मी स्वप्न पाहत आहे.'

'अ‍ॅनिमल'चे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले. १ डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 129 कोटींची कमाई केली आहे. यासह त्याने शाहरुख खानच्या 'जवान'ला मागे टाकले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती दिमरी यांच्याही भूमिका आहेत.

Share this article