Close

ॲनिमलमध्ये ‘जमाल कुडू’ गाण्याची स्टेप आली कुठून, बॉबी देओलनेच सांगितले सत्य (Bobby Deol Reveals Animal’s Viral Jamal Kudu Dance Step Was His Idea)

बॉलिवूडमध्ये सध्या ॲनिमलची सर्वाधिक चर्चा आणि हेडलाइन्स होत आहेत. या चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यावर चर्चा आणि वाद होत आहेत. इतके असूनही चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

आजकाल, चित्रपटातील जमाल कुडू हे गाणे चार्ट बस्टर्समध्ये अग्रस्थानी आहे. हे  गाणे प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडल्याने खूप वेगाने व्हायरल होत आहे. पण या गाण्यासोबतच त्याची सिग्नेचर स्टेपही चर्चेत आहे. या गाण्याने अबरारा म्हणजेच बॉबी देओल चित्रपटात एंट्री करतो. बॉबी चित्रपटात खलनायक बनला आहे आणि एकही संवाद न बोलता तो छोट्याशा भूमिकेतही सर्वांवर पूर्णपणे छाप पाडतो.

बॉबीनेच एका मुलाखतीत सांगितले होते की, जे गाणे इतके लोकप्रिय होत आहे, त्याची डान्स स्टेपची कल्पना स्वतः बॉबीचीच होती. त्याने सांगितले की संदीपने त्याला आधी हे गाणे सांगितले होते, जे त्याला खूप आवडले होते.

बॉबी पुढे म्हणाला की, कोरिओग्राफरने मला असं कर असं सांगितलं… मी डान्स करायला सुरुवात केली तेव्हा तो म्हणाला, नाही-नाही, बॉबी देओलसारखं करू नकोस. मग मी चित्रपटात माझ्या भावाची भूमिका साकारणाऱ्या सौरभला विचारले, तू हे करू शकतोस का? तू ते कसे करशील?

मला माझे बालपण आठवले की आम्ही पंजाबला जायचो तेव्हा लोक दारूचे ग्लास डोक्यावर घेऊन नाचायचे. बॉबी म्हणाला- आम्ही असे का केले हे मला कधीच समजले नाही. हे अचानक माझ्या मनात आले आणि मी ते केले. संदीपला ते आवडले.

या चित्रपटातील बॉबीच्या रेप सीनची बरीच चर्चा आहे आणि मीडियामध्ये त्याच्यावर बरीच टीका होत आहे. यामध्ये तो मानसी तक्षकने साकारलेल्या तिसऱ्या पत्नीवर जबरदस्ती करताना दिसत आहे. या वैवाहिक बलात्काराच्या दृश्यावर लोक टीका करत आहेत. यावर बॉबी म्हणाला की, हा सीन करताना मला कुठलाही संकोच वाटला नाही कारण तो मी नसून ते कॅरेक्टर करत आहे.

मी एका क्रूर पुरुषाची व्यक्तिरेखा साकारत होतो जो स्त्रिया आणि त्याच्या बायकांसोबत असे वागतो. तो एक दुष्ट व्यक्ती आहे आणि संदीपने मला या सीनसाठी खूप आरामदायक केलेले. आपल्यापेक्षा २९ वर्षांनी लहान असलेल्या मानसीसोबतच्या बॉबीच्या या सीनमुळे बराच वाद निर्माण झाला आहे.

Share this article