बॉलिवूडच्या कलाकार मंडळींची एकूण संपत्ती किती आहे, याबाबत बरेचदा चर्चा होत असते. तसेच ते एवढे पैसे कुठे खर्च करतात याबाबतही चर्चा होत असते. आपल्या देशातील बरेचसे कलाकार हे त्यांच्या वैयक्तिक खर्चाव्यतिरिक्त काही चांगल्या कामांसाठीही पैसे खर्च करताना दिसतात. यापैकी काही कलाकार जे सर्वाधिक दानी आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
शाहरुख खान - बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान हा मेक-ए-विश आणि मीर फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून लोकांची मदत करतो. या संस्था एनजीओ महिला आणि मुलांच्या हितासाठी कार्यरत आहेत. शाहरुखच्या या कार्यासाठी युनिसेफने त्याला सन्मानितही केले आहे. २०११ साली जर्मनीतील २०व्या युनेस्कोमध्ये शाहरुखला पिरॅमिड कॉन मार्नी पुरस्कार दिला गेला होता.
आमीर खान - आमीर खान हा जल फाउंडेशनचा निर्माता आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट देशातील जल संकटाबद्दल लोकांना जागृत करण्याचे काम करत आहे. तसेच आमीर खान मुलांचे शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थित व्हावे यासाठी युनिसेफ सोबत काम करतो.
सलमान खान - सलमान खानला यारों का यार असं म्हटलं जातं. तो गरजवंतांच्या मदतीसाठी सदा तत्पर असतो. दबंग खान हा बीईंग ह्युमन फाउंडेशनचा निर्माता आहे. गरीबांना शिक्षण, आरोग्य आणि भोजन मिळावे यासाठी तो मदत करतो.
अक्षय कुमार - अक्षय कुमार हा देशातील सर्वाधिक कर भरणारा कलाकार आहे. तो अक्षय पात्र फाउंडेशन चालवतो. या संस्थेमार्फत तो शाळेतील मुलांना जेवण पाठवतो. खिलाडी अक्षय सीआरव्हाय संस्थेचाही मेंबर आहे. ही संस्था मुलांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत आहे.
सोनम कपूर - सोनम कपूरने Unhcr सह अनेक संस्थांसोबत एकत्र येऊन कार्य केलं आहे. या संस्था रेफ्युजींच्या भवितव्यासाठी काम करतात. सोनम कपूरला मुलांची आवड आहे. ती स्माइल ट्रेनची सदस्य आहे. ज्या मुलांचे ओठ कापले-फाटले असतील, वा टाळूची सर्जरी आहे, अशा मुलांना ती मदत करते.