बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि चर्चेत असणाऱ्या इलियानानं चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. इलियाना आता एका गोंडस बाळाची आई झाली आहे. इलियानाने 1 ऑगस्ट 2023 रोजी मुलाला जन्म दिला. तब्बल पाच दिवसांनी तिने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली. इतकंच नाही तर लाडक्या मुलाचा पहिला फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केला. ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये इलियानाचा छोटा राजकुमार झोपलेला आहे.
फोटो शेयर करत तिने लेकाचं नावही सांगितलं आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, 'कोआ फिनिक्स डोलनला भेटा. त्याचा जन्म 1 ऑगस्ट रोजी झाला. तिने तिच्या लेकाचं नाव 'कोआ फिनिक्स डोलन' ठेवलं आहे.त्याचबरोबर पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, 'आमच्या लाडक्या मुलाचे जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होत आहे याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. आमचं हृदय प्रेमाच्या भावनेने भरले आहे.'
काही वेळातच इलियाना डिक्रूझची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली. तिच्या चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारांनी तिचे खुप अभिनंदन केले आहे.तिचा प्रियकर सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलपासून तिला हे बाळ झाल्याचं बोललं जातं आहे. काही काळापूर्वी तिने तिच्या जोडीदाराबद्दल खुलासा करत त्याचा एक फोटोही शेयर केला होता.
'बर्फी', 'बादशाहो', 'मैं तेरा हीरो', 'रुस्तम' आणि 'पागलपंती' यांसारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेली इलियाना लवकरच अनफेअर अँड लव्हली नावाच्या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे ज्याचं शूटिंग पूर्ण झालं असून हा सिनेमा 2023 मध्येच प्रदर्शित होऊ शकतो.