बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने नुकतेच आपण आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लग्नाच्या १२ वर्षांनी वयाच्या ३९व्या वर्षी राधिका आई होणार आहे. तिने तिचे बेबी बंप दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. राधिकाचे हे फोटो पाहून चाहते तिचे सोशल मीडियावर अभिनंदन करत आहेत. राधिकाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
राधिका आपटे बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सिस्टर मिडनाईट’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला गेली होती. जिथे तिने बेबी बंप दाखवत सर्वांना आश्चर्यचकित केले. यावेळी राधिकाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्या ड्रेसमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.
फोटो शेअर करताना राधिकाने लिहिले आहे की, सिस्टर मिडनाईट यूके प्रीमियर. तिने तिच्या पोस्टमध्ये प्रेग्नंट असल्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. फक्त चित्रपटाबद्दल लिहिले. राधिकाने तिचे काही सिंगल फोटो शेअर केले आहेत आणि काहींमध्ये ती रेड कार्पेटवर सेलिब्रिटी आणि क्रूसोबत पोज देताना दिसत आहे. राधिकाचे चाहते तिच्या पोस्टवर कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत.
राधिकाच्या लूकबद्दल बोलायचे झालं तर तिने ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता. राधिकाचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. राधिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झालं तर, तिने २०१२ मध्ये ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले आहे. दोघेही आपला वेळ मुंबई आणि लंडनमध्ये घालवतात. राधिकाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलणे आवडत नाही. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर राधिका नुकतीच कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मेरी ख्रिसमसमध्ये कॅमिओमध्ये दिसली होती.