नुकताच आलेल्या "आटा पिटा" गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील गाणं ‘मन हे गुंतले’ नुकतंच सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. गाणं रसिकांच्या मनावर हळवा प्रभाव पाडत असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून अविश्वसनीय प्रतिसाद येत आहे.
‘मन हे गुंतले’ गाणं ‘सुनिधि चौहान’ यांनी गायलं असून ‘गौरव चाटी’ यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे आणि ‘शिवम बरपंडे’ यांनी लिहिलं आहे. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून संदीप मनोहर नवरे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी प्रमुख भूमिकेत दिसणार असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे सुप्रसिद्ध अभिनेते झळकणार आहेत.