कॅप्टन मार्वल चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला हॉलिवूड अभिनेता केनेथ मिशेलचे निधन झाले आहे. रविवारी २४ फेब्रुवारी रोजी ही दु:खद घटना घडली. वयाच्या ४९ व्या वर्षी केनेथने या जगाचा कायमचा निरोप घेतला. 'स्टार ट्रेक: डिस्कव्हरी' आणि 'कॅप्टन मार्वल' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली होती.
आपल्या शानदार अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्याला ॲमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस या आजारापुढे हार मानावी लागली . अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी ही दु:खद बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अभिनेत्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टवर ही दुःखद बातमी शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'जड अंत:करणाने आणि दुःखाने आम्ही तुम्हाली बातमी शेअर करत आहोत, केनेथ अलेक्झांडर मिशेल, एक उत्तम वडील, चांगला पती आणि भाऊ, काका, मुलगा आणि मित्र आपल्यात राहिले नाहीत.', केनला गेले साडेपाच वर्षे एएलएसचा त्रास होता. या पोस्टमध्ये अभिनेत्यासाठी असे लिहिले आहे की, प्रत्येक दिवस हा एखाद्या सुंदर भेटवस्तूसारखा असतो तसेच आपण कधीही एकटे नसतो असे अभिनेत्याचे विचार होते. आयुष्यात प्रेम असेल तर आपण आयुष्य कसं परिपूर्ण असतं या गोष्टीचा तो उत्तम उदाहरण होता.
इंडस्ट्रीत शोककळा, चाहत्यांची श्रद्धांजली
अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. लोक त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करत आहेत. इंडस्ट्रीतील सहकलाकार तसेच त्याचा चाहतावर्ग त्याला श्रद्धांजली वाहत आहे.