Close

पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांना चंदू चॅम्पियन मधील स्वतःचा प्रवास पाहून अश्रू अनावर (Chandu Champion First Screening With Real Hero Murlikant Petkar Gets Emotional)

कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. काल या चित्रपटाचं मुंबईत स्क्रिनिंग झालं. यावेळी त्याच्याबरोबर पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर होते, हा चित्रपट पाहून ते भावूक झाले.

सध्या कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट उद्या १४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कथा पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये कार्तिकनं मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी कार्तिकनं खूप मेहनत घेतली असून त्याच्यामधील ट्रांसफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. दरम्यान, मुंबईतमध्ये हा चित्रपट कार्तिक आर्यननं खरा हिरो आणि भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्याबरोबर पाहिला.

'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट पाहिल्यानंतर मुरलीकांत पेटकर यांचा मुलगा भावूक होऊन त्यानं कार्तिक आणि चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांना मिठी मारली. यानंतर कार्तिक मुरलीकांत यांच्याकडे गेला आणि तो देखील भावूक झाला. कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन'च्या स्क्रिनिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुरलीकांत पेटकर बरोबर कार्तिक दिसत आहे. या स्क्रिनिंगला भारतीय भूदलामधील अधिकारीही आल्याचं दिसलं. 'चंदू चॅम्पियन'च्या पहिल्या स्क्रीनिंगचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत कार्तिकनं यावर लिहिलं, "चंदू चॅम्पियन'चे पहिले स्क्रिनिंग रिअल हिरो मुरलीकांत पेटकर सरांबरोबर, अनेक त्रासानंतरही आत्मसमर्पण करण्यास नकार देणारा माणूस, चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी दोन दिवस बाकी आहे."

'चंदू चॅम्पियन'चं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं असून साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक व्यतिरिक्त श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, पलक लालवानी, भुवन अरोरा, राजपाल यादव, विजय राज, मनोज आनंद आणि इतर स्टार्स दिसणार आहेत. याआधी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर चाहत्यांना खूप पसंत पडला.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'आशिकी 3'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'भूल भुलैया 3'मध्ये विद्या बालनबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर रिलीज होईल.

Share this article