साहित्य : कव्हर तयार करण्यासाठी : १ कप मैदा, १ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा-अर्धा टीस्पून लसूण पेस्ट, जिरे पावडर आणि हळद, अर्धा कप पालक पेस्ट, २ टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरून), पाव टीस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि साखर, ४ टेबलस्पून तेल, १ कप पाणी, तळण्यासाठी तेल
स्टफिंगसाठी - अर्धा कप चीज आणि १/४ कप पनीर (दोन्ही किसलेले), १ टीस्पून बटर.
कृती : कव्हरसाठीचे सर्व साहित्य (तळण्यासाठी तेल वगळता) एकत्र मिक्स करून मऊ पीठ मळून घ्या. पीठाच्या चपात्या लाटून गरम तव्यावर भाजून घ्या. स्टफिंगचे सर्व साहित्य मिक्स करा. चपातीवर पसरवून रोल करून घ्या. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
Link Copied