लोकप्रिय टीव्ही सिरियल सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ फ्रेडीची भूमिका साकारुन अभिनेता दिनेश फडणीस घराघरात लोकप्रिय झाले. पण त्यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिनेश फडणीस हे व्हेंटिलेटरवर असून जीवन-मरणाशी झुंज देत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. शुक्रवारी १ डिसेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण आता थोडी सुधारणा झाली आहे.
५७ वर्षीय अभिनेते दिनेश फडणीस सोशल मीडियावर सक्रिय असतात. तिथे ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. आता त्यांच्या हृदयविकाराच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. सीआयडी या मालिकेचे संपूर्ण कलाकार आणि क्रू या अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आले होते. याची माहिती त्यांना 1 डिसेंबर रोजीच देण्यात आली.
दिनेश यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी 1998 ते 2018 या काळात CID मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारली होती. त्यांची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. या अभिनेत्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या सिटकॉम शोमध्येही त्याने छोटी भूमिका केली होती. याशिवाय त्याने काही चित्रपटांमध्ये कॅमिओ देखील केला आहे.