Close

CID फेम फ्रेडरिक्सला हृदयविकाराचा झटका आलाच नव्हता, इन्पेक्टर दया म्हणजेच अभिनेते दयानंद शेट्टीने केला खुलासा (CID Fame Fredericks Did Not Suffer From Heart Attack, Reveals Actor Dayanand Shetty)

दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त काल संपूर्ण दिवस सर्वत्र चर्चेत होते. या बातमीने त्यांचे चाहतेही खूप चिंताग्रस्त झालेले. पण आता सीआयडी मालिकेतील दया म्हणजेच अभिनेते दयानंद शेट्टी यांनी एक वेगळाच खळबळजनक खुलासा केला आहे.

फ्रेडी म्हणजेच दिनेश यांची तब्बेत बिघडल्याचे समजताच सीआयडी मालिकेची संपूर्ण टीम हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेली होती. दिनेश यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर या मालिकेत दया हे लोकप्रिय पात्र साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी यांनी इंडियन एक्सप्रेस ला मुलाखत दिल्ली व परिस्थितीचा आढावा दिला. दयानंदने सांगितले की, ‘’दिनेश फडणीस हॉस्पिटलमध्ये दाखल असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखी खाली आहेत. पण त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, त्यांच्यावर दुसऱ्या आजारा संदर्भात उपचार सुरू आहेत. यावर मी आत्ताच भाष्य करू इच्छित नाही.

दयानंद यांच्या या वक्तव्यामुळे सीआयडी मालिकेचे चाहते फारच चिंतेत आहेत. हार्ट अटॅक नाही मग त्यांना नक्की कोणता आजार झाला आहे याबाबत त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आपल्या लाडक्या फ्रेडरिक्सला म्हणजेच दिनेश फडणीस यांना लवकर बरे वाटावे यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

Share this article