Close

मेकअपमध्ये कॉम्पॅक्ट पावडर आहे खास (Compact Powder Is The Soul Of Long Lasting Make up)

Compact Powder

मेकअपमध्ये कॉम्पॅक्ट पावडर आहे खास


फेस पावडर म्हणा वा कॉम्पॅक्ट पावडर (Compact Powder), हे मेकअपचे अतिशय महत्त्वाचे आणि सहजपणे कोठेही बाळगता येणारे प्रसाधन आहे. मेकअप दीर्घ काळ टिकावा यासाठी फेस पावडर उत्तम कार्य करते.
सौंदर्य प्रसाधनांमधील फेस पावडरचं महत्त्व आजच्या जमान्यात तरी कोणाला सांगायची गरज नाही. दिवसातून कितींदा तरी आपण टेलिव्हिजनवर फेस पावडरच्या जाहिराती पाहात असतो. या जाहिरातींवरून आपल्या एवढं तर लक्षात येतंच की फेस पावडरमुळे चेहरा उजळतो, तजेलदार होतो. पण मागे म्हणजे बरंच मागे गेलं तर आपल्या लक्षात येईल की, प्राचीन काळात जेव्हा कॉम्पॅक्ट वा फेस पावडरही नव्हती तेव्हा ग्रीसमधील स्त्रियांनी, शिसे आणि खडूची धूळ एकत्र करून स्वतःची पावडर बनवली आणि ती लावली. त्यांच्या या प्रयोगातून त्यांनी स्वतःला गोरं बनवलं. कच्च्या स्वरूपात त्वचेवर वापरली गेलेली ही पहिली पावडर होती आणि यातूनच पुढे रंग उजळण्यासाठी फेस पावडर वापरण्याची नवीन कल्पना पुढे आली. मग उत्क्रांती प्रक्रियेच्या मालिकेनंतर, टाल्कम पावडर बाजारात आली, जी सुद्धा अनेक वर्षे ज्यांना सुंदर दिसायला आवडते अशा स्त्रियांकडून चेहर्‍यावर वापरली जात होती.
फेस पावडर म्हणा वा कॉम्पॅक्ट पावडर, हे मेकअपचे अतिशय महत्त्वाचे आणि सहजपणे कोठेही बाळगता येणारे प्रसाधन आहे. मेकअप दीर्घ काळ टिकावा यासाठी फेस पावडर उत्तम कार्य करते. ही पावडर चेहर्‍यावर फाऊंडेशन लावल्यानंतर लावा किंवा फाऊंडेशन न लावता लावा, ही दोन्ही परिस्थितीत चेहर्‍यावर व्यवस्थित सेट होते. फेस पावडर ही चेहर्‍यावरील अतिरिक्त तेल घालवणारी एक उत्कृष्ट

Compact Powder


मॅटिफायर आहे.
फेस पावडरमधील वैविध्य
लूज पावडर - ही दिसताना इतर सामान्य पावडरप्रमाणेच दिसते अन चेहर्‍याची त्वचा एकसारखी बनवून तिला हलकीशी चमक देते.
प्रेस पावडर - ही पावडर मेकअपनंतर टचअप करण्यासाठी वापरली जाते.
शीयर पावडर - ही पावडर चेहर्‍यास अधिक तेजस्वी बनवण्याकरता मेकअपनंतर लावली जाते.
मॅट पावडर - ही पावडर त्वचेमधील अतिरिक्त तेल शोषून घेते अन चेहर्‍यास सुंदर आणि तजेलदार बनवते.
त्वचेचा पोत आणि कॉम्पॅक्टची निवड

Compact Powder


फेस पावडरबाबत असं म्हटलं जातं की, फेस पावडर जितकी महाग असेल तितका मेकअप सुंदर दिसतो. परंतु खरं म्हणजे, जर तुमची कॉम्पॅक्ट पावडर स्किन टोनशी सुसंगत नसेल, तर कितीही महाग फेस पावडर लावली, तरी चेहरा सुंदर दिसणार नाही.
फेस पावडर अशी वापरा जी चेहर्‍यावर लावल्यानंतर नैसर्गिक लूक देईल. चेहरा गोरापान बनवणारी पावडर चांगली असा समज करून घेऊ नका. बरेचदा सावळ्या रंगाच्या मुली वा बायका आपल्या त्वचेच्या रंगापेक्षा जास्त ब्राइट रंगाची पावडर लावण्याची चूक करतात. त्यामुळे त्यांचा संपूर्ण मेकअप विचित्र दिसतो. जर एखाद्या कारणाने स्किन टोनशी मॅच करणारी परफेक्ट कॉम्पॅक्ट पावडर नाही मिळाली, तर त्यांनी ट्रांसल्यूसेंट पावडर वापरावी.
कॉम्पॅक्ट कशी लावावी?

Compact Powder


कॉम्पॅक्ट लावण्यापूर्वी चेहर्‍यावर आइस क्युब फिरवून घ्यावा, जेणेकरून त्वचेवरील रंध्रे बंद होतील. तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेलही निघून जाईल. त्यानंतर मेकअप ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण चेहर्‍यावर एकसारखी फेस पावडर लावा. नंतर आपल्या चेहर्‍यासोबत ब्रशच्या मदतीने ती त्वचेमध्ये मिसळून घ्या.
फेस पावडर खरेदी करण्यापूर्वी ती आपल्या हातावर लावून बघून त्याची तपासणी करून घ्या. गोर्‍या महिलांनी पिंक अंडर टोनचे कॉम्पॅक्ट खरेदी करावे, तर सावळ्या रंगाच्या महिलांनी ऑरेंज अंडर टोनवाले कॉम्पॅक्ट निवडावे.
फेस पावडर लावण्यासाठी स्पंजचा वापर करु नये. कारण स्पंज जास्त मात्रेत पावडर खेचून घेतो. याऐवजी चांगल्या दर्जाच्या ब्रश प्लिकेटरचा वापर करा.

Compact Powder


गरमीच्या दिवसांत नेहमी वॉटरप्रुफ कॉम्पॅक्टच लावा. तेलकट त्वचा असणार्‍या महिलांनी शीयर कॉम्पॅक्ट पावडर लावू नये. कारण त्याने चेहरा अधिक तेलकट दिसतो.
पावडरच्या फिनिशवर देखील लक्ष दिलं पाहिजे. कारण त्यामुळे तुमच्या चेहर्‍यावर चमक येते. संवेदनशील त्वचा असणार्‍या महिलांनी मिनरल बेस्ड पावडरचा वापर करावा, म्हणजे त्वचेस नुकसान होणार नाही.
कॉम्पॅक्ट पावडरपासून तुम्हाला मिळू शकणारे
मुख्य फायदे
कॉम्पॅक्ट पावडर तुमच्या त्वचेच्या टोनशी उत्तम प्रकारे मिसळून तुमच्या चेहर्‍याला एकसमान लूक देते.
चांगल्या ब्रॅन्डमध्ये त्वचेच्या सुसंगततेची हमी असते.
आपल्या त्वचेतील दोष उत्कृष्टपणे लपवून त्वचेस उत्तम कव्हरेज ऑफर करते.
आणखी एक मोठा फायदा म्हणजे कुठेही मिरवता येते. फक्त ते तुमच्या क्लचमध्ये सरकवा आणि तुम्ही जिथे जाल तिथे घेऊन जा.
आता तुम्ही जर किशोरवयीन मुलींची वा बायकांची पर्स पाहिलीत तर त्यात कॉम्पॅक्ट पावडर नक्की सापडेल.

Share this article