Close

पाकिस्तान हल्ल्याशी दोन हात करायला येतोय फायटर, हृतिक रोशन, दीपिका पादुकोण ही नवीकोरी जोडी दाखवणार जादू (Deepika Padukone, Hrithik Roshan, Anil Kapoor Starer Fighter Trailer Release)

सध्या बॉलिवूडला चांगले दिवस आले आहेत. २०२३ हे वर्ष बॉलिवूडसाठी उत्तम ठरलं. आता २०२४ ची सुरुवात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या फायटरने होणार आहे. हा एक भारतातील सर्वात मोठा एरियल अॅक्शन चित्रपट असेल.

 'फायटर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद पुन्हा एकदा पडद्यावर या सिनेमाद्वारे धमाल उडवून देतील. आज १५ जानेवारी मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर हा ट्रेलर रिलीज झाला असून, या ट्रेलरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर यांच्या दमदार व्यक्तिरेखा पाहायला मिळतायत.

https://youtu.be/6amIq_mP4xM?si=SDy5M-Pf4KNBFlKJ

पाकिस्तानच्या हल्ल्यापासून देशाला वाचवणारी आणि दहशतवाद विरोधी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये हृतिक रोशन आकाशातून शत्रूंवर हल्ला करताना पाहायला मिळतोय. तर दीपिका आणि अनिल त्याला जमिनीवरुनच सर्व घडामोडी सांगत असतात.

हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर यांच्या दमदार अभिनय, तसेच दमदार स्क्रिप्टमुळे 'फाइटर'चा ट्रेलर प्रेक्षकांना भारतीय वायुसेनेच्या विशेष युनिट- एअर ड्रॅगनसोबत एका भयानक प्रवासात घडवतो. ट्रेलरमध्ये या नायकांची मैत्री, धैर्य आणि त्यागाचे सुंदर चित्रण केले आहे.

3D आणि 3D IMAX मधील नेत्रदीपक व्हिज्युअल इफेक्ट्सने परिपूर्ण, 'फाइटर' प्रेक्षकांसाठी संपूर्ण मनोरंजनाची हमी देतो. येत्या २५ जानेवारी २०२४ रोजी भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.  

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/