बॉलिवूडमध्ये अनेकदा चाहते कलाकारांच्या लग्नानंतर त्यांच्या मुलाबद्दल खूप उत्सुक असतात. काहीवेळा अभिनेत्री गर्भवती असल्याची अफवाही पसरते. कतरिनाबाबत अशा अनेक बातम्या आल्या होत्या आणि दीपिकासोबतही असेच अनेकवेळा घडले आहे, मात्र यावेळी या बातमीला दुजोरा मिळाला असून अभिनेत्री तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याचे बोलले जात आहे.
द वीकच्या रिपोर्टनुसार, दीपिकाची प्रेग्नेंसी कन्फर्म झाली आहे आणि तिच्या प्रेग्नेंसीचा दुसरा त्रैमासिक सुरू आहे, म्हणजेच अभिनेत्री चार महिन्यांची गरोदर आहे. द वीकच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने प्रेग्नेंसीच्या बातमीला दुजोरा दिला आहे. तिथूनच माध्यमातून दीपिका चार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे.
दीपिकाने बाफ्टा अवॉर्ड्स इव्हेंटमध्ये सब्यसाचीच्या डिझायनर साडीमध्ये प्रस्तुतकर्ता म्हणून हजेरी लावली होती तेव्हा साडीमध्ये तिने फ्रंट पोजऐवजी बॅक पोज दिल्या होत्या. एका पोजमध्ये ती तिचा बेबी बंप लपवताना दिसत होती. दीपिका लवकरच गुड न्यूज देणार आहे आणि त्यामुळेच ती साडी नेसून कार्यक्रमात पोहोचली, असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता.
रणवीर आणि दीपिकाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी चाहते वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी या जोडप्याने कुटुंब सुरू करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. अभिनेत्री म्हणाली होती की रणवीर आणि मला मुले आवडतात आणि आम्हालाही कुटुंब सुरू करायचे आहे, ते कधी होईल ते पाहूया.