Close

दीपिकाने दिली गुडन्यूज, दीपवीर होणार आईबाबा! (Deepika Padukone Share Her Pregnancy News)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपिका सप्टेंबर 2024 मध्ये आई होणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वजण या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच दीपिकाच्या पोस्टवर कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत.

दीपिकाने पोस्ट शेअर केली आणि हात जोडलेले व नजर काढण्याचा इमोजी शेअर केला. अलीकडेच बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये, चाहते दीपिकाचा बेबी बंप तिच्या साडीच्या लूकमध्ये दिसत असल्याबद्दल बोलत होते. तेव्हापासून दीपिकाच्या गरोदरपणाची चर्चा सुरू होती. आता दीपिकाने ही बातमी खरी असल्याचे जाहीर केले आहे. सात महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये दीपिका आणि रणवीरच्या घरात पाळणा हलणार आहे.

2018 मध्ये लग्न झाले

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नोव्हेंबर 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले. रणवीर आणि दीपिकाने इटलीतील लेक कोमो येथे विधींवत लग्न केले. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे जोडपे पालक बनणार आहेत. दीपिका आणि रणवीर हे बी-टाऊनमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. ही जोडी 'दीपवीर' या नावाने ओळखली जाते.

क्रिती सॅननने सर्वप्रथम अभिनंदन केले

दीपिका पादुकोण आई होणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. आज अभिनेत्रीने पोस्ट शेअर करून या बातम्यांना दुजोरा दिला आहे. ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनंदन करण्यात अभिनेत्री क्रिती सेनन आघाडीवर होती. दीपिकाच्या पोस्टवर कमेंट करताना क्रितीने लिहिले, 'ओएमजी, तुम्हा दोघांचे अभिनंदन.' मिठी मारण्याचा आणि हार्ट इमोजी देखील शेअर केले.

Share this article