Close

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती (Marathi Actress Bhagyashree Mote Broke Engagement With Vijay Palande Shared Post)

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. भाग्यश्री हिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपला साखरपुडा मोडल्याचे सांगितले आहे. अर्थात्‌ भाग्यश्री अन्‌ होणारा पती विजय पालांडे यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. भाग्यश्री आणि विजयचा १० ऑक्टोबर २०२२ रोजी साखरपुडा झाला होता. पण या कपलने लग्नाआधीच जवळपास दीड वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

भाग्यश्री मोटे कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले फॅशनेबल फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीचा हा विभक्त होण्याचा निर्णय पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. भाग्यश्री मोटेने पोस्टमध्ये लिहिलं की, “नमस्कार मित्रांनो, ही पोस्ट केवळ माहिती देण्यासाठी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही एकमेकांसोबत एकत्र राहत होतो. मी आणि विजय काही चांगल्या कारणांमुळे पार्टनर म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण आम्ही दोघेही एक चांगले मित्र म्हणून कायम राहू! कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा! धन्यवाद!” अशी पोस्ट भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने विजयलाही टॅग केलं आहे. भाग्यश्रीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

विजय पालांडे हा लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. त्याने आजवर अनेक सेलिब्रिटींबरोबर काम केलं आहे. भाग्यश्री व विजय यांनी कधीच आपलं नातं लपवलं नव्हतं. ते सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करायचे. दोघांनी दीड वर्षांपूर्वी थाटामाटात साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याला अभिनेता हृतिक रोशनने हजेरी लावली होती.

साखरपुडा केल्यानंतर दीड वर्षांनी भाग्यश्रीने ब्रेकअपची घोषणा केली आहे. ती व विजय चांगल्या कारणांसाठी वेगळे होत असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. भाग्यश्री मोटेनं मराठी चित्रपटांसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

Share this article