बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या आगामी 'फाइटर' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत असते. तिचे चाहते तिच्या या नव्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्रीसुद्धा नव्या वर्षात रिलीज होणाऱ्या या सिनेमाच्या यशासाठी व्यंकटेश्वराच्या मंदिरात गेली होती.
अभिनेत्री दीपिका पादुकोण गुरुवारी संध्याकाळी बहीण अनिशा पादुकोणसोबत तिरुमला येथे गेली होती. तेथील तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
https://x.com/ANI/status/1735311393212281115?s=20
एएनआयने काल संध्याकाळी वेंकटेश्वर मंदिरातील पूजेदरम्यान दीपिका पादुकोणचा व्हिडिओ X वर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दीपिका कॅज्युअल ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. दीपिकासोबत तिची बहीण अनिशा केशरी रंगाचा स्वेटशर्ट आणि काळी पँट अशा लूकमध्ये दिसत आहे.
दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीचा नवीन चित्रपट फायटर जानेवारी २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेत दिसेल.