Close

‘बाजीराव-मस्तानी’मधील या गाण्याची क्लिप ऑस्कर ॲकेडमीच्या इन्स्टाग्रामवर (Deepika-Padukones Fans Brim With Pride As The Academy Posts A Clip Of Bajirao-Mastani Ranveer Singh Reacts)

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या गरोदर असल्याकारणाने बॉलिवूडच्या (Bollywood) लाइमलाइटपासून दूर आहे. गरोदर असलेली दीपिका स्वत:ची काळजी घेत आहे. तर, दुसरीकडे आज दीपिकाचे ऑस्कर ॲकेडमीने कौतुक केले आहे. ऑस्कर ॲकेडमीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर दीपिका पदुकोणच्या नृत्याची क्लिप पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे. 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातील गाणे ऑस्कर ॲकेडमीने पोस्ट केले आहे. ॲकेडमीच्या पोस्टवर अभिनेता रणवीर सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. या गाण्याला स्वरबद्ध करणारी गायिका श्रेया घोषालने ऑस्कर ॲकेडमीचे आभार मानले आहे.

दीपिका पदुकोणने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. विन डिझेलपासून ते अनेक हॉलिवूड स्टार्स तिच्या अभिनयाचे चाहते आहेत. अलीकडेच 'द ॲकेडमी'ने दीपिकाच्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटातील एका गाण्याची क्लिप आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केली आहे. 'दीपिका पदुकोण 'दीवानी-मस्तानी' गाण्यावर परफॉर्म करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले असून हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. 'दीवानी-मस्तानी' हे त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक होते, अशी कॅप्शन दिली आहे. 'बाजीराव-मस्तानी'या चित्रपटात दीपिकासोबत प्रियांका चोप्राची देखील भूमिका होती असेही नमूद करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले.

द ॲकेडमीने दीपिकाच्या केलेल्या कौतुकावर अभिनेता रणवीर सिंहने आनंद व्यक्त केला. रणवीरने कमेंट करताना लिहिले की, मेस्मेरिक! सोशल मीडियावर दीपिकाच्या चाहत्यांकडूनही तिचे कौतुक होत आहे.

दीपिका पदुकोणचे चाहते जगभरात आहेत. सोशल मीडियावर दीपिकाच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने या गाण्यात दीपिकाचे सौंदर्य पाहण्यासारखं असल्याचे म्हटले. एकाने या गाण्यावर इतर कोणी या तोडीचा परफॉर्मन्स दिला नसता असेही म्हटले. आतापर्यंतच्या सर्वात सुंदरपणे चित्रीत केलेल्या गाण्याचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद असेही एका युजरने म्हटले.

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Share this article