Close

अभिनेत्री देवोलिनाच्या मित्राची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या; मदतीसाठी मोदींना केली विनंती (Devoleena Bhattacharjee Friend Killed In America In Cold Blood Actress Posted To Request Pm Modi)

टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिच्या मित्राची अमेरिकेत हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. हत्येनंतर मित्राचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याकडे मदत मागितली आहे. देवोलिनाचा मित्र आणि डान्सर अमरनाथ घोष याची अमेरिकेत गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

देवोलिनाने शुक्रवारी सोशल मीडियावर कोलकत्यातील मित्राबद्दल मोठी पोस्ट लिहिलीय. देवोलिनाच्या मित्राची मंगळवारी सायंकाळी अमेरिकेत हत्या झाली. यानंतर तिने त्याचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी सोशल मीडियावरून विनंती केलीय.

प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी  हिने नुकतेच एक ट्वीट (X) शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये देवोलिनानं सांगितलं आहे की, तिच्या मित्राची अमेरिकेत गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे देवोलिनानं मदतीची मागणी केली आहे. देवोलिनाच्या या ट्वीटनं (X) अनेकांचे लक्ष वेधले आहे.

देवोलिनाचं ट्वीट

देवोलिनानं ट्वीटमध्ये लिहिलं, "माझा मित्र अमरनाथ घोष याची मंगळवारी संध्याकाळी सेंट लुईस अकादमी परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या बाजूने लढण्यासाठी त्याच्या काही मित्रांशिवाय कोणीही उरले नाही. या प्रकरणातील आरोपीचा तपशील अद्याप उघड झालेला नाही.

पुढे देवोलिनानं ट्वीटमध्ये लिहिलं, "अमरनाथ हा कोलकाता येथील होता. तो उत्कृष्ट डान्सर होता, तो पीएचडी करत होता. त्या दिवशी तो संध्याकाळचा फेरफटका मारत होता आणि अचानक त्याच्यावर अज्ञाताने गोळ्या झाडल्या."

"अमरनाथ कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता, त्याच्या आईचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. यूएस मधील माझे काही मित्र अमरनाथचे पार्थव ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु अद्याप त्याबद्दल काहीही अपडेट आलेली नाही.", असंही देवोलिनानं ट्वीटमध्ये लिहिलं.

नरेंद्र मोदी, एस जयशंकर यांना टॅग करुन देवोलिनानं पुढे ट्वीटमध्ये लिहिलं, "कृपया तुम्हाला शक्य असल्यास या प्रकरणाची चौकशी करावी. निदान त्याच्या हत्येचे कारण आपल्याला कळावे"

फोटो - सोशल मीडिया

Share this article