Close

बॉलिवूड सेलिब्रिटी फिट राहण्यासाठी, ट्रेनर्सना देतात इतकी फीस… (Did You Know Katrina Kaif Kareena Kapoor Fitness Trainer Fees)

बॉलिवूडमध्ये काम करायचं असेल तर फिटनेस... अव्वल स्थानी असतं. अनेक अभिनेते, अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा, जीम करत असतात. फिटनेस ट्रेनर्सच्या मदतीने सेलिब्रिटी स्वतःला फिट ठेवतात. पण यासाठी सेलिब्रिटींना मोठी किंमत मोजावी लागते. तर आज जाणून घेवू कोणता सेलिब्रिटी फिटनेससाठी महिन्याला किती पैसे खर्च करतो...

अभिनेता हृतिक रोशन वयाच्या ४९ व्या वर्षी देखील प्रचंड हँडसम दिसतो. अभिनेत्याची स्टाईल फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्याच्या ट्रेनरबद्दल सांगायचं झालं तर, क्रिस गेथिन अभिनेत्याचा ट्रेनर आहे. ज्याची महिन्याची फी २० लाख रुपये आहे.

अभिनेत्री कतरीना कैफ देखील प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी ट्रेनर यास्मिन कराचीवाला अभिनेत्रीच्या फिटनेसची काळजी घेते. यासाठी यास्मिन महिन्याला ४५ हजार रुपये घेते.

इंडस्ट्रीमध्ये झिरो साईज ट्रेंड अभिनेत्री करीना कपूर हिने सुरु केला. करीनाची पर्सनल ट्रेनर नम्रता पुरोहीत आहे. जिची महिन्याची फी फक्त ६५ हजार रुपये आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा हिची फिटनेस ट्रेनर देखील ट्रेनर नम्रता पुरोहीत आहे. वयाच्या ५० व्या वर्षी देखील मलायका फिट असून बोल्ड आणि हॉट दिसते.

अभिनेत्री कंगना रनौत देखील फिटनेसच्या बाबत प्रचंड मेहनती आहे. फिटनेस ट्रेनर योगेश भतेजा अभिनेत्रीच्या फिटनेसची काळजी घेतो. ज्यासाठी अभिनेत्री महिन्याला ४५ हजार रुपये मोजते.

Share this article