अभिनेता रणबीर कपूरचा ब्लॉकबस्टर चित्रपट अॅनिमल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे या चित्रपटात रणबीर कपूरचे दाखवण्यात आलेले घर. तुम्हाला माहिती आहे का की, चित्रपटात रणबीर कपूर ज्या घरात राहतो ते खरे तर नवाब सैफ अली खानचे वडिलोपार्जित घर म्हणजेच पतौडी पॅलेस आहे.
अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल आणि इतर सर्व स्टार्सचा उत्कृष्ट अभिनय, लोकेशन्स, फायटिंग सीन्स सर्व काही इतके छान चित्रित करण्यात आले आहे की, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की चित्रपटात दाखवण्यात आलेले रणबीर कपूरचे घर हे खरे तर त्याचा मेहुणा सैफ अली खानचे वडिलोपार्जित निवासस्थान म्हणजेच पतौडी पॅलेस आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पतौडी पॅलेसची काही दृश्येही दिसत आहेत. ही दृश्ये सैफ अली खानच्या जुन्या फोटोंसोबत जोडून पाहू शकतात.
अॅनिमल चित्रपटातील अनेक दृश्ये पतौडी पॅलेसमध्ये शूट करण्यात आली आहेत. जसे- राजवाडा आणि मॅजेस्टिक हॉल समोर पसरलेले प्रचंड मैदान. अॅनिमलच्या आधीही पतौडी पॅलेसमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.
संदीप वंगा दिग्दर्शित या चित्रपटात पॅलेसचा ग्राउंड लॉन आणि कॉरिडॉर दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या एका दृश्यात, एक अतिशय रागावलेला, रक्ताने माखलेला, शर्टलेस रणबीर कपूर एक हॉलमधून येत असतो. सैफ अली खानचा जुना फोटो आहे, ज्यामध्ये तो हॉलमधून जात आहे. सैफचा हा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.