दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघेही गेल्या वर्षीच पालक झाले. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव रुहान ठेवले आहे. हे जोडपे अनेकदा रुहानसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात, त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहतात. यावेळी ही जोडी आणखी काही कारणांमुळे चर्चेत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुहानच्या जन्माच्या अवघ्या ७ महिन्यांनंतर दीपिका पुन्हा गरोदर आहे अभिनेत्री अलीकडेच तिचा बेबी बंप लपवताना दिसली.
सध्या शोएब 'झलक दिखला जा 11' मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. तर दीपिका अनेकदा तिच्या पतीला भेटण्यासाठी रुहानसोबत सेटवर येते. अलीकडे देखील, अभिनेत्री झलक दिखला जा 11 च्या सेटवर स्पॉट झाली होती, जिथून तिचे फोटो आता व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये, दीपिका बेबी बंप झाकताना दिसत आहे (त्यानंतर तिच्या दुसऱ्या गर्भधारणेच्या बद्दल चर्चा सुरु झाली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शोएब झलक दिखला जा 11 च्या सेटबाहेर त्याच्या फॅमिलीसोबत पॅप्ससाठी पोज देताना दिसत आहे. यावेळी लाल रंगाच्या अनारकली सूटमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती, मात्र नेटिझन्सचे लक्ष तिच्या दुपट्टा घालण्याच्या स्टाइलकडे गेले, त्यानंतर दीपिकाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू झाली.
दीपिकाने तिचा दुपट्टा अशा प्रकारे बांधला होता की त्यामुळे तिचे पोट झाकले होते, तिचे वजन खूप वाढलेले दिसते. याशिवाय ती चालतानाही अस्वस्थ दिसत होती, त्यानंतर यूजर्सना खात्री झाली की दीपिका आणि शोएब दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. आतापर्यंत या जोडप्याने या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी वापरकर्ते आणि चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.
दीपिका आणि शोएबचे 22 फेब्रुवारी 2018 रोजी लग्न झाले होते. लग्नाच्या पाच वर्षानंतर या जोडप्याने 21 जून 2023 रोजी मुलगा रुहानचे स्वागत केले. रुहान आता सात महिन्यांचा आहे.