दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबद्दल चित्रपट निर्माता अभिषेक कपूरने मोठा खुलासा केला आहे. चित्रपट निर्मात्याने सांगितले की 2018 मध्ये जेव्हा तो सुशांतसोबत केदारनाथ चित्रपटाचे शूटिंग सुरु होते, तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला होता.
'काई पो चे' आणि 'केदारनाथ' चित्रपटात काम निर्माते अभिषेक कपूरने सुशांतसोबत काम केलेले. मुलाखतीत निर्मात्यांनी सुशांतच्या कामाबद्दल सांगितले , केदारनाथ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान तो प्रचंड थंडीत शूट करायचा हेही त्याने सांगितलं. त्यावेळी सुशांतने कोस्टार सारा अली खानलाही प्रेरणा दिलेली.
मुलाखतीदरम्यान अभिषेक कपूरने सांगितले की, त्याला त्याच्या 'फितूर' चित्रपटात सुशांत सिंगला कास्ट करायचे होते. पण सुशांत सिंग राजपूतसोबत काही जमलं नाही. नंतर या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांना मुख्य भूमिका साकारण्यात आल्या होत्या.
अभिषेकने सांगितले की, जवळपास सर्वच चित्रपट निर्मात्यांना सुशांतचे 'काई पो चे'मधील काम आवडले. या चित्रपटात सुशांतसोबत काम केल्याने माझ्यात आणि त्याच्यात एक खास नातं तयार झालं. त्यामुळेच मी सुशांतला केदारनाथमध्ये कास्ट केले.
अभिषेकने सांगितले की, केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत सिंह खूप नाराज होता. सुशांत काही अडचणीत आहे किंवा कठीण टप्प्यातून जात आहे असे वाटत होते. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असूनही त्याला खूप एकटेपणा जाणवत होता.