गेल्या वर्षी, 20 सप्टेंबर रोजी राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी बाळाचे स्वागत केले. तेव्हापासून चाहते बाळाचा चेहरा पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. त्याच दरम्यान अचानक या जोडप्याने विमानतळावर पॅप्ससमोर मुलगी नव्याची ओळख करून दिली आणि तिचा चेहरा दाखवला.
हे जोडपे दोहाला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलगी नव्या देखील होती. दोघांनीही आपल्या मुलीसोबत प्रेमाने पोज दिली. दरम्यान चाहत्यांनी आणि मीडियाने नव्या कोणावर गेली असे विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा बहुतेक लोकांनी सांगितले की ती खूप गोंडस आहे आणि ती अगदी वडील राहुल वैद्यची कार्बन कॉपी आहे.
येथे व्हिडिओ पहा https://www.instagram.com/reel/C3P38I0BzME/?igsh=MzRlODBiNWFlZA==
नवीन पाच महिन्यांची झाली आहे. बरेच दिवस चाहते राहुल आणि दिशाला नव्याचा चेहरा कधी दाखवणार याबद्दल विचारत होते. तेव्हा राहुल नेहमी लवकरच दाखवणार असे सांगत होता आणि आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.
नव्या मुंबई विमानतळावर आईच्या कुशीत होती. पांढऱ्या बेबी सूटमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. नव्याने गुलाबी रंगाचा हेडबँड आणि गुलाबी शूज घातलेले. दिशाने ब्लॅक टी-शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती आणि राहुलने जीन्स टी-शर्ट आणि जॅकेट घातले होते.
दिशाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर बाळाचा चेहराही उघड केला आहे आणि नव्याच्या पहिला फ्लाइट प्रवास दाखवला आहे.