Close

जागतिक कर्करोग दिन : स्तनांचा कर्करोग प्रगत उपचारांनी बरा होऊ शकतो – डॉक्टरांचा आश्वासक सल्ला (Doctor’s Promise On World Cancer Day : Breast Cancer Is Curable With Progressive Treatment)

स्तनाचा कर्करोग झाल्याचे समजल्यानंतर अत्यंत त्रासदायक व वाईट वाटण्यासह तुम्ही भावूक होऊ शकता. जगभरात स्तनाचा कर्करोग हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, जेथे जागतिक स्तरावर २ दशलक्षहून अधिक व्यक्तीना स्तनाचा कर्करोग असल्याचे आढळून आले आहे. नुकतेच करण्यात आलेल्या आयसीएमआर संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील स्तनाच्या कर्करोगाने पीडित रूग्णांचा जगण्याचा दर ६६.४ टक्के आहे. ही स्थिती आव्हानात्मक असली तरी कर्करोगाने पीडित फक्त तुम्हीच नाही हे समजून घेणे आवश्यक आहे.

स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांमधील प्रगती आणि उपलब्ध विविध सपोर्ट सिस्टम्स पाहता कर्करोगामधून बरे होण्याच्या प्रवासात आवश्यक स्थिरता व पाठिंब्याची खात्री मिळते. दिल्लीमधील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पि‍टल येथील मेडिकल ऑन्कोलॉजीमधील सीनियर कन्सलटण्ट डॉ. मनिष के. सिंघाल म्हणाले, ''माझ्या अनुभवानुसार गंभीर आजार असल्याचे समजल्यानंतर ८० टक्‍क्‍यांहून अधिक रूग्ण घाबरून जातात, त्यांना जीवनाचा शेवट होण्याची भिती वाटते. व्यक्ती व त्यांच्या प्रियजनांमधील हे भितीचे वातावरण पाहता मी सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा सल्ला देतो. यामध्ये निदान झालेला आजार समजून घेणे, वैयक्तिकृत केअर योजना तयार करणे, उपचार पर्यायांबाबत सखोलपणे चर्चा करणे आणि मानसिक आरोग्यासाठी स्थिर पाठिंबा देणे यांचा समावेश आहे. रुग्णांना योग्य माहितीसह सक्षम करण्याबरोबरच ते त्यांच्या आरोग्याबाबात योग्य निर्णय घेऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत सर्वोत्तम जीवन जगण्याची शाश्वती देणारी प्रगत उपचार थेरपी उपलब्ध असल्याचे दाखवून देणे महत्त्वाचे आहे. आरोग्यसेवा व्यावसायिक (डॉक्टर्स) व रूग्ण यांच्यामधील सहयोगात्मक प्रयत्नाच्या माध्यमातून या स्थितीच्या वैद्यकीय पैलूंचे निराकरण करता येऊ शकते, तसेच जीवनाचा एकूण दर्जा देखील वाढवता येऊ शकतो, ज्यामुळे आरोग्य विषयक आव्हनात्मक स्थितीमध्ये स्थिरता व अर्थपूर्ण माहितीची खात्री मिळेल.''

Share this article