सध्याच्या काळात सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचा साधन म्हणून ओळखल जात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका श्वानाला एक व्यक्ती मारहाण करताना दिसत आहे. अभिनेता रितेश देशमुख ने सुद्धा या व्हिडिओवर आपला राग व्यक्त केला होता.
त्यानंतर आता ठरलं तर मग या मालिकेतील मुख्य अभिनेत्री सायली म्हणजे जुई गडकरी ने सुद्धा इंस्टाग्राम पोस्टमार्फत या व्हिडिओवर रोष व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एका पेट स्पा मधील व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओ बद्दल जुई म्हणाली की, एका स्पा सेंटर मध्ये कुत्र्याला कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ खूप अस्वस्थ करणारा आहे.मला तो व्हिडिओ पूर्ण पाहताच आला नाही. मारहाण करणाऱ्या त्या मनोरुग्णाला देव चांगलीच शिक्षा करो. ज्या हाताने त्याने त्या मुक्या जीवाला मारहाण केले ते हात काही दिवसांनी कामच करणार नाहीत.... कृपया हा अत्याचार थांबवा आणि त्या कर्मचाऱ्याला अटक करून कठोर शिक्षा द्या.
तो कुत्रा आता असू देत.... कृपया तुमच्या प्राण्यांना अशा क्लिनिक किंवा स्पा सेंटरमध्ये एकटं पाठवू नका. रितेश आणि जुईने या व्हिडिओबद्दल आवाज उठवल्यावर इतर सोशल मीडिया वापर करते देखील यावर राग व्यक्त करत आहेत तसेच व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.