Close

कपडे धुताना काय काळजी घ्याल? म्हणजे ते नव्यासारखे दिसतील (Easy Tips To Give Your Clothes A New Look After Every Wash)

तुमचा आवडता टी- शर्ट आणि आधुनिक स्टाइलची जीन्स, तुमचं रूप खुलवणारा क्लासी फॉर्मल वेअर, आकर्षक पार्टी वेअर, तलम कॉटनवेअर किंवा स्टायलिश जिम वेअर – कोणतेही कपडे असोत, थोडंसं लक्ष देऊन ते कायम नवे आणि ताजेतवाने राहतील याची काळजी घेता येईल.

गोदरेज अप्लायन्सेसच्या वॉशिंग मशिन विभागाचे उत्पादन समूह प्रमुख शशांक सिन्हा यांनी कपडे धुताना काय काळजी घ्यावी याच्या टिप्स दिल्या असून त्यांच्या मदतीने कपडे दरवेळेस नवे आणि टवटवीत दिसतील.

कपड्यांची काळजीपूर्वक विभागणी करा

सुरुवातीला कपड्यांचे रंग, प्रकार, ते किती मळले आहेत यानुसार विभागणी करा. फिकट आणि गडद रंगाचे कपडे वेगळे धुतल्याने रंग जाऊन ते खराब होण्याची शक्यता कमी होते व कपडे नव्यासारखे दिसतात. कपड्यावर असलेल्या लेबलवर दिलेल्या विशिष्ट सूचना व शिफारसीनुसार ते धुणं केव्हाही चांगलं.

कपड्यांची आतली बाजू बाहेर काढा

कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाकण्यापूर्वी त्यांची आतली बाजू बाहेर काढा. विशेषतः प्रिंटेड आणि नाजूक कपडे. यामुळे बाहेरचा भाग सुरक्षित राहतो.

खराब व डाग पडलेले कपडे थोडा वेळ भिजवून ठेवा  

कपडे भिजवण्यानं त्यावरील मळ आणि डागांचा चिवटपणा कमी होतो. बऱ्याच घरांत कपडे भिजवण्याची ही चांगली पद्धत पाळली जाते. जर तुमच्या वॉशिंग मशिनमध्ये कपडे भिजत घालण्यासाठी वेगळी सोय असेल, तर ते बकेटमध्ये भिजवून ठेवण्याची गरज नाही.

योग्य डिटर्जंट वापरा

खूप डिटर्जंट वापरण्यानं कपड्यावर त्याचा काही भाग कायम राहातो आणि कमी डिटर्जंट वापरल्यास कपडे चांगल्या प्रकारे धुतले जात नाहीत. वॉशिंग मशिनच्या कंट्रोल पॅनेलवर दिलेल्या डिटर्जंट स्कूप इंडिकेटरमुळे किती डिटर्जंट वापरावे हे कळते. रंग कायम राखण्यासाठी वॉशदरम्यान फॅब्रिक सॉफ्टनरही वापरता येईल.

मशिनचा ड्रम आणि लिंट कलेक्टर नियमितपणे स्वच्छ करा

बहुतेक वॉशिंग मशिन्समधील लिंट कलेक्टरमध्ये काही वॉश सायकल्सनंतर बरीच घाण जमा होते. आठवड्यातून एकदा ते काढून नळाखाली स्वच्छ करणे आवश्यक असते. यामुळे लिंट कलेक्टर जास्त चांगल्या प्रकारे काम करतो व कपडे व्यवस्थित धुतले जातात. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा टब क्लीन फीचर वापरून ड्रममध्ये साचलेली घाण स्वच्छ करण्यानेही कपडे धुण्याचा दर्जा उंचावतो.

मशिन ओव्हरलोड करणे टाळा

वॉशिंग मशिनच्या क्षमतेपेक्षा जास्त कपडे धुवायला टाकल्यास ते खळबळण्याची आणि स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे घर्षण व बिघाडही होऊ शकतो. मशिनच्या क्षमतेविषयी दिलेल्या सूचनांचे पालन करा. वॉश सायकलदरम्यान कपडे मोकळेपणाने फिरावेत यासाठी जागा ठेवणं आवश्यक आहे.

Share this article