Close

सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खानची आई मेनका इराणी यांचं निधन (Farah Khan Mother Menaka Irani Died In Mumbai)

सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खानची आई मेनका इराणी यांचं आज (२६ जुलैला) मुंबईत निधन झालं आहे. त्या ७९ वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, मेनका काही दिवसांपासून आजारी होत्या. नुकतंच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अहवालांनुसार, याआधीही मेनका इराणी यांना एकदा नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर आता त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी समोर आली आहे.

मेनका इराणी या डेझी इराणी आणि हनी इराणी यांच्या बहिण होत्या. मेनका यांनी १९६३ साली आलेल्या ‘बचपन’ या सिनेमात अभिनेत्री म्हणूनही काम केलं होतं. यात सलमान खानचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान देखील होते. मेनका यांनी चित्रपट निर्माते कामरान यांच्याशी लग्न केलं होतं.

मेनका इराणी यांचा दोन आठवड्यांपूर्वीच ७९ वा वाढदिवस झाला. फराह खानने सोशल मीडियावर आईबरोबरचे फोटो शेअर केले होते. “आपण सर्वजण आपल्या आईला गृहीत धरतो, खासकरून मी! मी माझी आई मेनकावर किती प्रेम करते याची जाणीव मला झाली. ती मी पाहिलेली सर्वात धाडसी व्यक्ती आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई,” असं कॅप्शन तिने लिहून पोस्ट केली होती.

फराहचे वडील कामरान खान यांना दारूचे व्यसन होते, त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलं होतं, असं अनेकदा तिने सांगितलं आहे. “मी एका फिल्मी कुटुंबातील आहे, पण मी पाच वर्षांचे होते तोपर्यंत आम्ही खूपच गरीब होतो. वडिलांचा चित्रपट फ्लॉप झाला आणि आम्ही आमचे सर्व पैसे गमावले. आमचे नातेवाईक आमची काळजी घ्यायचे. नातेवाईकांनी आम्हाला त्यांच्या घरात राहू दिलं होतं,” असं फराह म्हणाली होती.

Share this article