Close

विद्युत जामवालकडे मागितली लाच, सिनेमाला चांगलं रेटिंग देण्याच्या बदल्यात लाचखोरी (Film critic demands bribe from Vidyut Jammwal For Good Movie Rating)

 विद्युत जामवालने एका मोठ्या चित्रपट समीक्षकावर लाच मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. विद्युत जामवालने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पैशांची लाच मागितल्याची ही बाब उघड केली.

विद्युत जामवालने सांगितले की पैसे देण्यास नकार दिल्यावर  चित्रपट समीक्षकाने त्याला ब्लॉक केले आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर या चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला, त्यात असे दिसतेय की, एक चित्रपट समिक्षकाने तुझ्या सिनेमाला चांगलं रेटिंग देतो असे म्हणत काही रकमेची मागणी केली. पण विद्युत पैसे देण्यास नकार दिला तर त्याने त्याला थेट ब्लॉकचे केले.

विद्युतने ही पोस्ट शेअर करुन लिहिलं आहे की, लाच देणं आणि लाच मागणं हा गुन्हा आहे.... माझा गुन्हा म्हणजे ‘लाच न देणं ?’,# सुमित काडेल... सुमित काडेल हे लाच घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पण विद्युतचा सच्चेपणा पाहून त्याचे चाहते मात्र फार खुश झाले आहे. त्याबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत.

Share this article