यंदाचा ६९ वा काल गुजरातच्या गांधीनगर येथे फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शानदारपणे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात '12th फेल' सिनेमाने बाजी मारली असून कोणत्या कलाकारांनी अभिनेत्री - अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला? जाणून घेऊया.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची संपूर्ण यादी
फिल्मफेअर अवॉर्ड नुकताच पार पडला. हा फिल्मफेअर अनेक कारणांनी महत्त्वाचा ठरला. यंदाचा फिल्मफेअर गुजरातच्या गांधीनगर येथे पार पडला. अभिनेता रणबीर कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. विक्रांत मेस्सीच्या ‘12वी फेल’ या सिनेमानं फिल्मफेअरमध्ये बाजी मारली. तर ‘OMG2’ या सिनेमानं देखील शानदार कामगिरी केली. एनिमल या सिनेमाला यंदाच्या फिल्मफेअरमध्ये सर्वाधिक नामांकन मिळाली होती. पाहूयात संपूर्ण यादी.
‘OMG2’ या सिनेमासाठी अमित राय यांनी सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर देऊन गौरवण्यात आलं. त्यानंतर विदु विनोद चोप्रा यांच्या ‘12वी’ फेल सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. आलिया यांना ‘रॉकी ओर रानी की प्रेम कहानी’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट संवादाचा पुरस्कार इशिता मोइत्रा हिला मिळाला. तसंच करण जोहरच्या ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमातील ‘तेरे वास्ते’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गीतासाठी फिल्मफेअर मिळाला.
एनिमल सिनेमाविषयी सांगायचं झाल्यास, ‘एनिमल’ सिनेमाला यंदाच्या फिल्मफेअरसाठी तब्बल 19 नामांकन मिळाली होती. अभिनेता रणबीर कपूरला ‘एनिमल’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. ‘एनिमल’च्या सगळ्या संगीतकारांना सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम म्हणून सन्मानित करण्यात आलं. ‘पठाण’मधील ‘बेशर रंग’ या गाण्याची गायिका शिल्पा रावला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून फिल्मफेअर देण्यात आला. तर ‘एनिमल’ सिनेमाली अर्जन वैली साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक भूपेंद्र बब्बल ठरला. तर डायरेक्टर डेविड धवन याला फिल्मफेअरचा जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आलं.
सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्री हिनं ‘फर्रे’ या सिनेमातून डेब्यू केला होता. तिला देखील सर्वोत्कृष्ट पदार्पणसाठी फिल्मफेअर मिळाला. तर अभिनेता आदित्या रावल याला ‘फराज’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. तर अभिनेत्री शबाना आजमी यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या सिनेमात सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखेसाठी पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे अभिनेत्री रानी मुखर्जी आणि शेफाली शाह यांना ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ आणि ‘थ्री ऑफ अस’ या सिनेमासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्री समीक्षक पुरस्कार पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. तर ‘जोरम’ या सिनेमाला समीक्षकांनी निवडलेला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून गौरवण्यात आलं.