Close

बेपत्ता सोढी परतल्यानंतर पहिला फोटो आला समोर, खूपच म्हातारा दिसतोय अभिनेता (First Photo Come Out After he come back to home)

अभिनेता गुरचरण सिंहचा घरी परतल्यानंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्यासोबत गुरुचरणचा फोटो ट्विटरवर शेअर केला. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता २५ दिवसांनंतर शुक्रवारी दिल्लीत त्याच्या घरी परतला.

फोटोमध्ये गुरुचरण सिंह पोलिस कर्मचाऱ्याच्या शेजारी उभा राहून हसून पोज देत आहे. एएनआयच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, 'हा म्हातारा झाला आहे.' फोटोमध्ये गुरुचरण सिंहने पगडी आणि काळा टी-शर्ट घातला आहे. त्याची दाढी पिकली आहे. त्यामुळे फोटो पाहून लोक त्याला म्हातारा म्हणत आहेत.

घरी परतल्यानंतर लगेचच, दिल्ली पोलिसांनी अभिनेत्याची चौकशी केली आणि स्थानिक न्यायालयात त्याची जबानी नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने, आध्यात्मिक प्रवासासाठी घर सोडले होते. अभिनेत्याचे वडील हरजीत सिंग सुरुवातीला आमच्याशी बोलायला कचरत होते. त्यांना त्यांच्या मुलाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, तो घरी येऊन दोन दिवस झाले आहेत.

मुलगा घरी परतल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्यांना कसं वाटतंय यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आता माझी प्रकृती ठीक आहे. तो इथेच फिरत होता. त्याचे अपहरण झाले नव्हते. आम्ही पोलिसांना सर्व काही सांगितले आहे, तुम्ही त्यांना विचारु शकता.

Share this article