इनसाइड आउट 2 सह या १२ जूनला भावनिक रोलर कोस्टर साठी सज्ज व्हा! डिस्ने पिक्सार इंडियाने भारतीय प्रेक्षकांसाठी एक रोमांचक सहयोगाची घोषणा केली आहे. युथ आयकॉन आणि जनरल-झेड ची आवडती अनन्या पांडे, डिस्ने आणि पिक्सरच्या इनसाइड आउट 2 मधून डबिंग मध्ये पदार्पण करत आहे, इनसाइड आउट 2 या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनमध्ये ती रिलेला तिचा आवाज देणार आहे.
डिस्ने इंडिया आणि बॉलीवूडमधील काही मोठ्या नावांमधील यशस्वी सहकार्यानंतर ही रोमांचक बातमी आली आहे. इनक्रेडिबल्स 2 मध्ये काजोलने इलास्टिगर्लमध्ये तिचा करिष्मा आणलेला आपण पाहिला, तर प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांनी फ्रोझन 2 च्या एल्सा आणि ॲना ह्यांच्याशी बर्फाळ मजा मस्ती केली. ऐश्वर्या राय बच्चनने 'मिस्ट्रेस ऑफ एविल' मधील शक्तिशाली मेलफिसेंट म्हणून प्रेक्षकांना भुरळ घातली आणि अर्थातच, शाहरुख खानने आर्यन खानसोबत द लायन किंगसाठी आवाज दिला. आणि आता, अनन्या पांडे या रँकमध्ये सामील होण्यासाठी तयार आहे, व तिच्या चाहत्यांना ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे.
ट्रेलर व्हिडिओमध्ये तिचा उत्साह दिसून आला आहे. इनसाइड आऊट 2 हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना प्रतिध्वनित करणारा, विनोद आणि हृदयाने भरलेल्या कल्पनारम्य साहसावर प्रेक्षकांना घेऊन जाण्याचे वचन देतो.