Close

गर्भवती महिलांसाठी… (For Pregnant Women…)

गरोदरपणात स्त्रीने स्वतःसोबतच आपल्या उदरात वाढणार्‍या बाळाच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेणं गरजेचं असतं. कशी घ्यावी ही काळजी?

लग्न झालं की, स्त्री अर्धांगिनी बनते, तर त्याच्या पुढची पायरी म्हणजे ती जननी होते. मातृत्व ही खरोखर स्त्रीला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. गरोदरपणात स्त्रीने स्वतःसोबतच आपल्या उदरात वाढणार्‍या बाळाच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेणं गरजेचं असतं. कशी घ्यावी ही काळजी, त्याविषयी-
गरोदर महिलांनी दुपारच्या वेळेस रोज दोन संत्री खाल्ल्यास बाळ सुंदर आणि निरोगी होतं.
दररोज दोन चमचे मध घेतल्याने गरोदर महिलांमध्ये रक्ताची कमतरता राहत नाही, तसंच शेवटच्या तीन महिन्यांत दुधातून मध घेतल्यास मूल सुदृढ होतं.
गरोदर महिलांसाठी बेलाचा मुरांबा अतिशय उपयुक्त ठरतो. जेवणानंतर या मुरांब्याचं सेवन केल्यास प्रसूतीच्या कळांचा (लेबर पेन) त्रास कमी होतो आणि बाळही धष्ट-पुष्ट जन्माला येतं.
खडीसाखर आणि खोबरं चावून खाल्ल्याने बाळाचे डोळे मोठे आणि सुंदर होतात.
काही वेळेस गर्भवती स्त्रीचं गर्भाशय खाली आलेलं असतं आणि त्यामुळे गर्भपात होण्याची भीती असते. अशा वेळी तिला काळ्या चण्याचा काढा करून प्यायला द्या. त्यामुळे गर्भपात होण्याची भीती निघून जाईल.
पाचव्या महिन्यापासून गर्भवतीने मीठ खाण्याचं प्रमाण कमी करावं. त्यामुळे प्रसूती वेदनेचा त्रास होणार नाही.
स्तनांतील दूध वाढवण्यासाठी…
बाळंतपणानंतर काही स्त्रियांच्या स्तनामध्ये व्यवस्थित दूध नसतं, त्यामुळे बाळाची भूक भागत नाही. अशा वेळी
हे उपाय करता येतील-
स्त्रियांना दूध येत नसेल, तर त्यांनी उडदाच्या डाळीचं सेवन अधिक करावं.
तुरीच्या डाळीमध्ये तूप घालून प्याल्याने स्त्रियांच्या दूध अधिक येण्यास मदत होते.
पेर, द्राक्ष, चिकू, पपई यांचं सेवन केल्यानेही स्तनामध्ये दूध वाढतं.
50 ग्रॅम शतावरी आणि 50 ग्रॅम साखर दोन्ही बारीक वाटून, चाळणीने चाळून एका जारमध्ये भरून ठेवा. त्यातील 1-1 टीस्पून पावडर रोज दुधातून घ्या. असं 15 दिवस घेतल्यास दूध चांगलं येतं.
रात्री गहू भिजवून ठेवा. सकाळी दोन्ही हातांनी व्यवस्थित चोळून गुळासोबत खा आणि वरून कोमट पाणी प्या.
गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून ते थोडं पातळ करून सकाळ-संध्याकाळ घ्या.
दुधात चणे भिजवून खा.
जिरं भाजून सकाळ-संध्याकाळ साखरेसोबत खा.
मटारची भाजी जास्त प्रमाणात खा. कच्चे मटार खाल्ल्यानेही विशेष फायदा होतो.

आणखी काही उपयुक्त टिप्स
सुंठ पूड तुपात परतवून त्यात गूळ मिसळा. त्याचा सुका हलवा बनवा नि गर्भवतीला द्या. त्यामुळे तिला कधी रक्ताची कमतरता येणार नाही.
बाळाच्या जन्मानंतर गरोदर स्त्रीच्या सतत पोटात दुखतं, कधी कधी हे दुखणं सहनही होत नाही. अशा वेळी काही दिवस नियमितपणे खोबरं आणि गूळ घ्यावं. त्यामुळे आराम मिळेल.

Share this article