आपल्यासारख्या सामान्य पालकांप्रमाणेच, बॉलीवूड स्टार देखील त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करतात आणि स्वतःच्या मुलांच्या आनंदासाठी ते सर्वकाही करतात. इतकेच नाही तर हे स्टार्स आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अनेक स्टार्सनी आपल्या मुलांचे नाव आपल्या शरीरावर गोंदवले आहे. या कलाकारांमध्ये प्रियंका चोप्रा-सुष्मिता सेनपासून ते अजय देवगण-अक्षय कुमारपर्यंत अनेक स्टार्सची नावे आहेत.
प्रियांका चोप्रा
ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राने अलीकडेच नवीन टॅटू काढला आहे. हा टॅटू दुसरा तिसरा कोणाचाच नसून तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचा आहे. प्रियांकाने तिच्या हातावर मुलगी मालती मेरीच्या चेहऱ्याचा टॅटू बनवला आहे. प्रियांकाच्या चाहत्यांना तिचा हा साधा आणि गोंडस टॅटू आवडला आहे. मात्र, हा प्रियांकाचा पहिला टॅटू नाही. तिने तिच्या शरीरावर इतर अनेक टॅटू बनवले आहेत.
रणबीर कपूर
बॉलीवूडचा देखणा अभिनेता रणबीर कपूर त्याची छोटी परी राहा कपूरवर किती प्रेम करतो हे कोणापासून लपून राहिलेले नाही. राहाच्या जन्मानंतर, त्याचे कोणतेही मीडिया संभाषण त्याच्या मुलीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. अभिनेत्याच्या कॉलरबोनवर त्याची मुलगी राहा हिचे नाव कोरले आहे, जे त्याने फोटोशूट दरम्यान उघड केले.
अजय देवगण
अजय देवगणचा आपली दोन्ही मुले, न्यासा देवगण आणि युग यांच्यावर खूप जीव आहे. त्याने न्यासाचे नाव छातीवर गोंदवले आहे.
विक्रांत मेस्सी
अभिनेता विक्रांत मेस्सी एका मुलाचा बाप झाला असून त्याने आपल्या मुलाचे नाव वरदान ठेवले आहे. आपल्या मुलावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने आपल्या मनगटावर वरदानचे नाव गोंदवले आहे.
अक्षय कुमार
अक्षय कुमार हा केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर तो एक परिपूर्ण कौटुंबिक माणूस देखील आहे. जरी तो त्याचं वैयक्तिक जीवन सोशल मीडियापासून दूर ठेवत असला तरी, त्याचे पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांच्यावर खूप प्रेम आहे. अक्षय कुमारने आपल्या पाठीवर आरवच्या नावाचा टॅटू बनवला आहे, जो त्याने अनेकदा फ्लाँट केला आहे. याशिवाय त्याने आपली मुलगी नितारा हिचे नावही आपल्या खांद्यावर कोरले आहे.
अर्जुन रामपाल
या यादीत बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता अर्जुन रामपालच्या नावाचाही समावेश आहे. अर्जुनने त्याच्या दोन मुली मायरा आणि माहिका यांची नावे हातावर गोंदवली आहेत.
रवीना टंडन
कूल गर्ल रवीना टंडनच्या खांद्याच्या मागील बाजूस वरदान आणि विशाका ही नावे लिहिली आहेत.
सुष्मिता सेन
अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या मुलींच्या नावाचा टॅटू गोंदवला आहे.
कुणाल खेमू
कुणाल खेमूने त्याची मुलगी इनाया नौमी खेमूच्या नावाचा टॅटू गोंदवला आहे. कुणालने २०२० मध्ये हा टॅटू बनवला. कुणालने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपल्या मुलीच्या नावाचा टॅटू फ्लाँट केला होता.