झी मराठीवर सारेगमप लिटिल चॅम्प्सचे यंदाचे पर्व गुरुकूलवर आधारित होता या गुरुकुलात मुलांना वैशाली म्हाडे आणि सलील कुलकर्णी या दिग्गज गायकांचे मार्गदर्शन लाभले. तर सुरेश वाडकर या गुरुकुलाचे मुख्याध्यापक होते. नुकताच या शो चा महाअंतिमसोहळा पार पडला.
सारेगमप लिटिल चॅम्प्सचा महाअंतिमसोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यंदा मुंबईची श्रावणी वागळे, जयेश खरे, गोव्याचा हृषिकेश ढवळीकर, देवांश भाटे, जयेश खरे आणि गौरी अलका पगारे महाअंतिम पोहचले होते. या अतितटीच्या सामन्यात कोपरगावच्या गौरी पगारेने पहिला क्रमांक पटकावला.
गौरी पगारेला बक्षीस म्हणून १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश तसेच चांदीची वीणा मिळाली. तर उपविजेत्या ठरलेल्या श्रावणी वागळे आणि जयेश खरेला प्रत्येकी १ लाख रुपये मिळाले. तर इतर स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले गेले.
गौरी पगारे ही खेडेगावातील मुलगी आहे. तिच्या घरची परिस्थिती फारच हालाखीची आहे. तिच्याकडे शिक्षणासाठीही पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळेच गायिका वैशाली म्हाडेने तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली असून सुरेश वाडकर यांनी तिला त्यांच्या संगीत विद्यालयात शिक्षण देणार असल्याचे कबुल केले आहे.