Close

फक्त 4 आठवड्यात करा पोट सपाट (Get Flat Tummy In Just 4 Weeks With These Workouts)

दिवसभर जास्त तास बसून काम करण्याची पद्धत आणि सतत स्कूटर, मोटारगाडी, ऑटोरिक्षा या वाहनांनी प्रवास करण्याची सवय लागल्याने शरीरातील मेद वाढत चालल्याच्या तक्रारी आहेत. पोट सुटले आहे, वाढले आहे; याचीही काळजी वाटते आहे. हे पोट कमी कसे होईल, यावर काही मार्ग सुचत नाही का? कोणतेही उपकरण न वापरता फक्त 4 आठवड्यात तुम्ही पोट सपाट करू शकता. मात्र हे व्यायाम आठवड्यातून 3 दिवस केले पाहिजेत.

पहिला आठवडा
व्यायाम 1 : पाठीवर झोपा. पायात अंतर ठेवा. हात शरीराला समांतर ठेवा. आता गुडघे मुडपा. वर उचला. छातीकडे न्या. हातांच्या जोरावर डोके आणि खांदे वर उचला. पाय वर उचलून सरळ करा. नंतर पूर्वस्थितीत या. पुन्ही हिच क्रिया 10 ते 15 वेळा करा.

व्यायाम 2 : जमिनीवर बसा. पाठ सरळ ठेवा. दोन्ही हात मागे डोक्यामागे ठेवा. डोके हातांवर राहू द्या. हळूहळू मागे वाका. गुडघे वर उचलून छातीकडे न्या. पाठ आणि पाय यांच्यामध्ये इंग्रजी व्ही अक्षरासारखे अंतर असू द्या. थोडा वेळ या अवस्थेत राहून पाय हळूहळू जमिनीवर टेकवा. पूर्वस्थितीत या. पुन्ही हिच क्रिया 10 ते 15 वेळा करा.

दुसरा आठवडा
व्यायाम 1 : पाठीवर झोपा. हात डोक्याखाली न्या. पाय हळूहळू वर उचला. 90 अंश कोनात वर सरळ ठेवा. आता नितंब वर उचला व पाय हळूहळू छातीकडे नेण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ या स्थितीत राहून पाय खाली आणा व पूर्वस्थितीत या. पुन्हा हिच क्रिया 10 ते 15 वेळा करा.

व्यायाम 2 : पालथे झोपा. हात चेहर्‍याच्या रेषेत मुडपून ठेवा. तळहात आणि कोपराच्या जोरावर संपूर्ण शरीर हळूहळू वर उचला. यासह पायाच्या पंजांनी वर शरीर तोला. पाठ सरळ रेषेत राहील, इतपत शरीर वर तोला. पोट आत ओढून घ्या. पाच सेकंद या स्थितीत राहा. मग हळूहळू शरीर खाली आणा व पूर्वस्थितीत या. ही क्रिया किमान 5 वेळा करा.

तिसरा आठवडा
व्यायाम 1 : पालथे झोपा. हाताच्या जोरावर शरीराचा वरचा भाग तोला. हात खांद्याच्या रेषेत राहतील, असे बघा. पायाची टाच वर उचलली पाहिजे. शरीर तिरपे राहील, अशा अवस्थेत या. उजवा गुडघा छातीकडे नेऊन ठेवा. पुन्हा मागे पहिल्या स्थितीत पाय न्या. मग डावा गुडघा छातीकडे नेऊन ठेवा. पुन्हा मागे पहिल्या स्थितीत पाय न्या. मग डावा गुडघा छातीकडे नेऊन ठेवा. त्याला मागे पहिल्या स्थितीत न्या. या क्रिया पुन्हा, किमान 1 मिनिट तरी करा.

व्यायाम 2 : पाठीवर झोपा. दोन्ही हात जमिनीवर, खांद्याच्या रेषेत पसरा. दोन्ही पाय वर उचला, सरळ रेषेत न्या. दोन्ही पाय हवेत वर्तुळाकार फिरवा. 5-7 वर्तुळे काढल्यावर थांबा. पाय खाली आणा. पुन्हा पाय वर उचलून उलट दिशेने, हवेत वर्तुळाकार फिरवा. ही वर्तुळे 5-7 काढा.

चौथा आठवडा
व्यायाम 1 : पालथे झोपा. हात चेहर्‍याच्या रेषेत मुडपून ठेवा. तळहात आणि कोपराच्या जोरावर संपूर्ण शरीर हळूहळू वर उचला. यासह पायाच्या पंजांनी वर शरीर तोला. पाठ सरळ रेषेत राहील, इतपत शरीर वर तोला. पोट आत ओढून घ्या. आता डाव पाय उचलून बाहेरच्या दिशेला न्या व जमिनीवर आघात करून पूर्वस्थितीत आणा. नंतर उजवा पाय उचलून हीच क्रिया करा. किमान प्रत्येक स्थिती 5 वेळा तरी करा.

व्यायाम 2 : पाठीवर झोपा. हात शरीराला समांतर ठेवा. पाय वर उचला. नितंबांच्या रेषेत आणा. डोके हळूहळू वर उचला. पोट आत ओढा. पाय वर खाली करा. पाय खाली जमिनीवर येतील व वर नितंबांच्या रेषेत येतील, अशा हालचाली करा. जणू कैची चालवत आहोत, अशा पायांच्या हालचाली करा. या क्रिया किमान 10 वेळा करा.

Share this article